दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बीएसएनएलकडून मोबाईल ग्राहकांसाठी नेटवर्क लेव्हल अँटी-स्पॅम, एसएमएसमध्ये येणाऱ्या दुर्भावपूर्ण लिंक्स वितरणापूर्वीच ब्लॉक केल्या जातात


बीएसएनएल ग्राहकांसाठी सुरक्षित, आश्वासक आणि उत्तम संपर्काचा अनुभव

Posted On: 14 AUG 2025 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

बीएसएनएलने मोबाईल ग्राहकांसाठी आज राष्ट्रव्यापी नेटवर्क-साइड अँटी-स्पॅम आणि अँटी-स्मिशिंग संरक्षणाच्या कार्यान्वयाची घोषणा केली. यासाठी कुठलेही अॅप इन्स्टॉल करावे लागणार नाही, सेटिंग्समध्ये बदल करावे लागणार नाहीत. एसएमएसमधले संशयास्पद आणि फसवे यूआरएल वास्तविक वेळेत शोधले जातात आणि नेटवर्क एजवरच(मोबाईल उपकरण किंवा स्थानिक नेटवर्क इंटरनेटशी जिथे मिळते ती सीमा) ते रोखले जातात. त्यामुळे बनावट लिंक बीएसएनएल वापरकर्त्यांना वितरित होणार नाहीत, मात्र ट्रायच्या डीएलटी/यूसीसी चौकटीअंतर्गत कायदेशीर ओटीपी, बँकिंग अलर्ट आणि सरकारी संदेश येणे सुरू राहील. इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये यासंबंधी पूर्वविलोकन झाले होते. 

भारतातील आघाडीचा क्लाऊड कम्युनिकेशन्स मंच असलेल्या तन्लासह तयार करण्यात आलेली ही प्रणाली AI/ML, NLP रेप्युटेशन इंटेलिजन्स आणि लिंक विस्तार यांचे संयोजन करते, लाईन रेटच्या वेगाने संदेशांचे विश्लेषण अथवा प्रक्रिया करते आणि भारतीय दूरसंवाद  कंपन्यांनी अवांछित व्यावसायिक संप्रेषणाला आळा घालण्यासाठी आधीच स्वीकारलेल्या  ब्लॉकचेन DLT स्टॅकसह एकत्रितपणे कार्य करते. हे तंत्रज्ञान स्मिशिंगविरोधात(फसव्या संदेशांविरोधात)  99%+ प्रभावी ठरले असून नवीन मोहिमा जलद निष्क्रिय करण्यासाठी परिसंस्था एकत्रीकरणासह (उदा., प्रमुख वेब आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म) राष्ट्रीय स्तरावर कार्य करते.

नो-स्पॅम सोल्यूशनचे प्रमुख मुद्दे:

  • दररोज 1.5 दशलक्षाहून अधिक घोटाळे शोधते
  • दरमहा 35,000+ वैशिष्ट्यपूर्ण  फसव्या लिंक्स आणि 60,000 बनावट  व्हाट्सअॅप आणि मोबाइल क्रमांक  ओळखते

जर तुम्ही बीएसएनएल ग्राहक असाल, तर दुर्भावनापूर्ण-लिंक एसएमएस स्वयंचलितपणे ब्लॉक केले जातात, ज्यामुळे क्रेडेन्शियल चोरी आणि पेमेंट फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

उपलब्धता: लाईव्ह सर्कलमधील सर्व बीएसएनएल मोबाइल ग्राहकांसाठी संरक्षण आपोआपच लागू आहे.

अधिक माहितीसाठी:1800-180-1503 किंवा www.bsnl.co.in.

 

* * *

शैलेश पाटील/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156624)