पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक हत्ती दिन 2025, तामिळनाडू मध्ये कोइम्बतूर येथे 12 ऑगस्ट रोजी साजरा होणार
जागतिक स्तरावरील हत्तींच्या लोकसंख्येपैकी 60% भारतात आहे
33 हत्ती अभयारण्ये आणि 150 संचारमार्ग भारताच्या मजबूत संरक्षण चौकटीचे प्रतिबिंब आहेत
कोइम्बतूर येथिल कार्यक्रमात मानव-हत्ती संघर्ष कमी करणे हा मुद्दा केंद्रस्थानी असेल
Posted On:
11 AUG 2025 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2025
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC), तामिळनाडू वन विभागाच्या सहकार्याने, 12 ऑगस्ट रोजी कोइम्बतूर येथे जागतिक हत्ती दिन साजरा करणार आहे. या वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या उपग्रहावरील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती असलेल्या हत्ती या प्राण्याच्या संवर्धनासाठी आणि त्यांचे दीर्घकालीन अस्तित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिक उपाययोजना करण्यासाठी जागतिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला जाणार आहे.
EKZL.jpeg)
भारतातील हत्ती कॉरिडॉरवरील 2023 च्या अहवालानुसार, जगातल्या वन्य हत्तींच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 60% हत्ती भारतात राहतात, भारतात हत्तींसाठी 33 राखीव प्रकल्प आणि 150 हत्ती संचारमार्ग आहेत. अतिशय काटेकोर कायदेशीर संरक्षण, मजबूत संस्थात्मक चौकट आणि व्यापक जनाधार यासर्वांमुळे मानवी कल्याण आणि वन्यजीव संवर्धनाचा मेळ घालण्यात देशाला जगभरात आघाडीवर म्हणून ओळखले जाते. हत्तींना राष्ट्रीय वारसा प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे आणि ते देशाच्या परंपरा आणि संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत.
आपल्या जैविक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी परिचित असणाऱ्या तामिळनाडूने हत्तींची एक मोठी संख्या टिकवून ठेवली आहे आणि मानव - हत्ती संघर्ष कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोइम्बतूर येथे होणारा हा कार्यक्रम वनपाल, धोरणकर्ते, नागरी समाज प्रतिनिधी आणि वन्यजीव तज्ञांना, संवर्धन धोरणे आणि संघर्ष निराकरण यावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आणि तमिळनाडू सरकारचे वन आणि खादी मंत्री थिरु आर. एस. राजकन्नप्पन यांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमात पर्यावरण आणि पर्यावरण मंत्रालय, तमिळनाडू वन विभाग, रेल्वे मंत्रालय आणि इतर राज्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.
उद्याच्या जागतिक हत्ती दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथे मानव आणि हत्ती यांच्यातले संघर्ष कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमुळे हत्तींच्या श्रेणीतील राज्यांना मानव आणि हत्ती यांच्या सहअस्तित्वाशी निगडित आव्हाने सामायिक करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रदेशात त्यांनी अंमलात आणलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. प्रोजेक्ट हत्ती या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या प्रयत्नांशी हा उपक्रम सुसंगत आहे. यामध्ये मानव आणि हत्तींमधील संघर्ष या अतिशय गंभीर समस्येबाबत तसेच हत्तींचे संवर्धन करताना स्थानिक जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुदाय सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला जाईल.

हत्ती आपल्या आहाराच्या आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असताना ही कार्यशाळा होत असून राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय आणि सहकार्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात आहे. यात सहभागी तज्ञ, धोरणकर्ते, संवर्धनवादी आणि वन अधिकारी सर्वोत्तम पद्धतींपासून ते अधिवास व्यवस्थापन आणि संचारमार्ग देखरेख ते जनजागृती आणि तीव्र संघर्षांच्या प्रदेशात क्षमता विकास या मुद्द्यांवर विचारमंथन करतील. या सहयोगी दृष्टिकोनामुळे मानवाचे हित जपताना वन्यजीव संवर्धन तसेच समुदाय आणि हत्ती यांमध्ये दीर्घकालीन सहअस्तित्व निर्मिती यांच्यात समतोल साधला जाईल.
हत्तींच्या संवर्धनासाठी व्यापक सार्वजनिक संपर्क आणि वचनबद्धता दर्शवण्यासाठी सुमारे 5,000 शाळांमधील अंदाजे 12 लाख शालेय मुलांना सहभागी करून एक देशव्यापी जागरूकता कार्यक्रम सुरू केला जाईल.

* * *
जयदेवी पुजारी स्वामी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155039)