भारतीय निवडणूक आयोग
उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 2025
भारतीय निवडणूक आयोगाने जारी केली अधिसूचना
Posted On:
07 AUG 2025 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांसाठीचा निवडणूक कायदा, 1952 च्या कलम 4 मधील उपकलम (4) आणि (1) अंतर्गत तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज भरणे, त्यानंतर अर्जांची छाननी तसेच अर्ज मागे घेणे आणि आवश्यकता असल्यास निवडणूक घेण्यासाठीच्या तारखा निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. उपरोक्त अधिसूचना आज भारतीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून विविध राज्यांच्या राजपत्रांमध्ये संबंधित अधिकृत भाषेमध्ये ही अधिसूचना पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.
- उपरोल्लेखित अधिसूचना आणि आयोगाची दिशादर्शक तत्वे यांना अनुसरून, 2025 च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्यसभेचे महासचिव यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांसाठीची निवडणूक कायदा, 1974 च्या नियम 3 अंतर्गत भारत सरकारच्या राजपत्रात सार्वजनिक नोटीस जारी केली करून या नियमांसोबत जोडलेल्या अर्ज 1 ची माहिती दिली असून हा अर्ज देखील राज्यांच्या अधिकृत भाषांमध्ये राज्य सरकारी राजपत्रात पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.
- सरकारी नोटीस मध्ये खालील तपशील नमूद करण्यात आले आहेत:
- निवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्याचे ठिकाण: निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, खोली क्र.आरएस-28, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली.
- अर्ज सादर करण्याची तारीख आणि वेळ: दिनांक 21 ऑगस्ट 2025 पर्यत (त्यानंतर नाही) कोणत्याही दिवशी (सरकारी सुटीचा दिवस वगळता) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत.
- अनामत रक्कम: आरओ अथवा भारतीय रिझर्व्ह बँक किंवा सरकारी तिजोरीत रुपये 15,000 रोख जमा करणे.
- अर्जासोबत सादर करणे आवश्यक असलेली कागदपत्रे :
- ज्या मतदारसंघात उमेदवार मतदार म्हणून नोंदणीकृत आहे त्या मतदार संघातील मतदारांच्या यादीत उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणिकृत प्रत
- अनामत रक्कम जमा केल्याची पावती.
- उपरोल्लेखित कार्यालयातून वर दिलेल्या वेळेत उमेदवारीशी संबंधित अर्ज मिळतील.
- अर्जांच्या छाननीचे ठिकाण: खोली क्र. एफ-100, संगोष्ठी-2, पहिला मजला, संसद भवन,नवी दिल्ली.
- उमेदवारी अर्जांच्या छाननीची तारीख आणि वेळ: दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता.
- निवडणूक घ्यावी लागली तर दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, त्यासाठीचे मतदान दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत खोली क्र.एफ-101, वसुधा, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे घेण्यात येईल.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153657)