दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल विभागाची प्रगत टपाल तंत्रज्ञान (एपीटी) प्रणालीकडे देशव्यापी वाटचाल
Posted On:
06 AUG 2025 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025
भारतीय टपाल विभागाने आयटी 2.0 अंतर्गत आपल्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये प्रगत टपाल तंत्रज्ञान (एपीटी) प्रणालीचा राष्ट्रव्यापी मोठा बदल अंमलात आणला आहे. या बदलाचा उद्देश जलद, स्मार्ट आणि ग्राहक-केंद्रित टपाल सेवा प्रदान करणे आहे.
शहरी, ग्रामीण आणि दूरस्थ भागांमध्ये कार्यरत 1.64 लाखांहून अधिक टपाल कार्यालयांमध्ये हे परिवर्तन करण्यात आले आहे. या कार्याच्या व्यापकतेमुळे 4 ऑगस्ट 2025 रोजी पहिल्या दिवशी कामकाज काही प्रमाणात मंदगतीने झाले. तथापि, तांत्रिक पथकाने चोवीस तास काम करून 5 ऑगस्ट 2025 पासून हे काम सुरळीत केले.
या परिवर्तनाशी संबंधित अडचणी लक्षात घेऊन, विभागाने समर्पित सहाय्यक पथके आणि रिअल-टाईम देखरेख प्रणाली आधीच कार्यान्वित केल्या होत्या, ज्यामुळे कार्यातील समस्या तत्काळ सोडवता आल्या. प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली आता देवाणघेवाणी व्यवहारांना गती, डिजिटल पेमेंट एकत्रीकरण, रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि एकंदर वापरकर्ता अनुभवामध्ये लक्षणीय सुधारणा करत आहे.
5 ऑगस्ट 2025 रोजी, या नव्या प्रणालीद्वारे देशभरातून 20 लाखांहून अधिक टपाल नोंदवण्यात आले आणि 25 लाखांहून अधिक टपाल वितरित करण्यात आले.
भारतीय टपाल विभाग सतत आणि अखंड सार्वजनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. विभाग कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुरळीत व कार्यक्षम परिवर्तनासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.
या महत्त्वपूर्ण डिजिटल उन्नयन प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी दाखवलेल्या संयम आणि सहकार्याबद्दल विभाग त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
जयदेवी पुजारी स्वामी/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153135)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam