पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधानांनी सर गंगाराम रुग्णालयाला दिली भेट

Posted On: 04 AUG 2025 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर गंगाराम रुग्णालयाला भेट देऊन शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण केली.

'एक्स' वरील वेगवेगळ्या पोस्ट्समध्ये त्यांनी म्हटले आहे :

“शिबू सोरेनजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सर गंगाराम रुग्णालयाला भेट दिली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. हेमंतजी, कल्पनाजी आणि सर्व समर्थकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

@HemantSorenJMM

@JMMKalpanaSoren”

“झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दु:खाच्या या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना भेटून शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होते, त्यामुळे ते सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील.

@HemantSorenJMM

@JMMKalpanaSoren”

निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2152120)