राष्ट्रपती कार्यालय
अमृत उद्यानातील ग्रीष्मकालीन वार्षिक पुष्प प्रदर्शन 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, 2025 पर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुले राहणार
29 ऑगस्ट रोजी खेळाडूंना व 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांना विशेष प्रवेश
Posted On:
02 AUG 2025 10:49AM by PIB Mumbai
अमृत उद्यान येथील ग्रीष्मकालीन वार्षिक पुष्प प्रदर्शन 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, 2025 पर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुले असणार आहे. या काळात उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुले राहील. संध्याकाळी 5:15 नंतर प्रवेश बंद होईल. देखभालीसाठी उद्यान दर सोमवारी बंद राहील.
राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून 29 ऑगस्ट रोजी क्रीडापटूंना तर, 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाणार आहे.
अभ्यागतांसाठी प्रवेश व बाहेर पडण्याचा मार्ग नॉर्थ ॲव्हेन्यू रोडजवळील प्रवेशद्वार क्र. 35 इथून असेल. अमृत उद्यानात प्रवेश विनामूल्य असेल. अभ्यागत त्यांच्या भेटीसाठी visit.rashtrapatibhavan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, असे अभ्यागत प्रवेशद्वार क्र. 35 बाहेर ठेवलेल्या स्व - सेवा केंद्रावर (self-service kiosks) नोंदणी करू शकतात.
अभ्यागतांना मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक चाव्या, बटवा, हँडबॅग, पाण्याची बाटली, लहान मुलांची दुधाची बाटली आणि छत्री सोबत घेऊन जाण्याची परवानगी असेल. या व्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू आत घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही.
उद्यान भेटी अंतर्गत बाल वाटिका, हर्बल गार्डन, बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि सर्क्युलर गार्डन पाहता येतील. उद्यानातील विविध वनस्पती व उद्यानाच्या रचनेबद्दलच्या माहितीसाठी सर्वत्र क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.
या वर्षी, अभ्यागतांना ‘बॅब्लिंग ब्रूक’ हे एक नवीन वैशिष्ट्य अनुभवायला मिळेल. या नैसर्गिक क्षेत्रात खाली नमूद गोष्टी पाहता येतील:-
- पाण्याचे नागमोडी प्रवाह, शिल्पांचे कारंजे, पायऱ्यांचे दगड व उंच परावर्तित कुंड
- रिफ्लेक्सोलॉजी पाथ्स (reflexology paths), पंचतत्त्व ट्रेल्स तसेच जंगलापासून प्रेरित नैसर्गिक मधूर ध्वनीचे वन
- गवतांनी अच्छादलेल्या टेकड्या आणि खास लावलेल्या वनस्पतीमुळे आपल्या आत्मिक अनुभूती देणारे शांत हर्बल आणि प्लुमेरिया उद्यान
***
शिल्पा पोफळे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151673)