पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याकडून व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी
Posted On:
31 JUL 2025 12:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या परस्पर वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे सकारात्मक मूल्यमापन केले आणि दोन्ही देशांतील जनतेच्या सामायिक हितासाठी सहकार्य अधिक विकसित आणि दृढ करण्यावर भर दिला.
शेख मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पद भूषवणारे पंतप्रधान बनल्याबद्दल अतिशय जिव्हाळ्याने अभिनंदन केले आणि त्यांना राष्ट्रसेवेत सतत यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी शेख मोहम्मद यांचे त्यांच्या शुभेच्छांसाठी आणि त्यांनी भारताच्या लोकांविषयी व्यक्त केलेल्या आपुलकीबद्दल आभार मानले.
***
SonalTupe/ShileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150625)
Visitor Counter : 3
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam