ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला बचत गटांना वितरित कर्ज 11 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावर


ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा

Posted On: 29 JUL 2025 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025

 

ग्रामीण विकास मंत्रालयाने दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या योजनेअंतर्गत औपचारिक वित्तीय संस्थांद्वारे महिला बचत गटांना  11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आले आहे.

हा महत्त्वाचा टप्पा बँकिंग क्षेत्राच्या अपार सहकार्यामुळे घडता आला असून सर्वसमावेशक विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण पातळीवर आर्थिक सक्षमतेसाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे  हे प्रतीक आहे. 

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे मुख्य उद्दिष्ट गरीब महिलांना मजबूत सामुदायिक संस्थांमध्ये संघटित करून आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देत ग्रामीण गरिबी दूर करण्याचे आहे. ग्रामीण भागात कर्ज वितरणासाठी हे बचत गट महत्त्वाचे माध्यम ठरले असून ते अर्थपूर्ण आर्थिक समावेशन सुलभ करत आहेत आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना प्रोत्साहन देत आहेत. या सातत्यपूर्ण कर्ज प्रवाहामुळे ग्रामीण महिलांचा उद्योजकीय आत्मविश्वास वाढला असून त्यांनी स्वतःचे उत्पन्न देणारे उपक्रम सुरू करून त्यांचा विस्तार करण्यास सक्षम बनल्या आहेत.

ही यशोगाथा शक्य झाली की बँकिंग क्षेत्रातील सहकार्यामुळे. बँकांनी  कोट्यवधी महिलांची स्वप्ने सध्या उतरवण्यासाठी वित्तीय आधार दिला. बँकिंग क्षेत्राच्या योगदानाने महिला बचत गट चळवळीला बळकटी दिली आहे आणि सामूहिक स्वप्नांपासून आर्थिक स्वावलंबनाकडे जाण्याचा प्रवास वेगाने पार केला आहे.

बँक सखींचे योगदान - बँक सखी म्हणून काम करणाऱ्या बचत गटातील महिला सदस्यांनी बँकिंग प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कर्ज मिळवून देणे, कर्ज परतफेडीसाठी मदत करणे, दस्तऐवजीकरण आणि व्यवहार सुलभ करणे यामध्ये त्या बचत गट आणि औपचारिक बँकिंग संस्थांमधील विश्वसनीय संपर्क म्हणून काम करत आहेत.

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि लखपती दीदी योजनेसारख्या उपक्रमांद्वारे बचत गट चळवळ लाखो महिलांना सक्षम बनवत आहे. 11 लाख कोटी रुपयांच्या या कर्ज वितरणामागे तारणमुक्त कर्ज सुविधा, व्याज सवलत, आर्थिक सहाय्य अशा उपक्रमांचा हातभार आहे. विशेष म्हणजे बचत गटांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण 98% हून अधिक आहे. 

बँका आणि बँक सखी यांचे महत्वपूर्ण योगदान

येथे हे नमूद केले पाहिजे की बँकांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या माध्यमातून बचत बचत गट सदस्यांना वित्तीय सेवा मिळणे सुलभ केले आहे आणि कर्ज प्रक्रिया सरल तसेच पारदर्शक बनवली आहे. दुसरीकडे बँक सखींनी बँक व्यवहार, दस्तऐवजीकरण, कर्जासाठी अर्ज करणे यामध्ये बचत गट सदस्यांना मदत केली. त्यांनी विमा, निवृत्तीवेतन योजनेविषयी जागरूकता निर्माण केली, आधार आणि मोबाईल संलग्नता सुलभ केली. वेळेवर कर्ज परतफेड करण्यासाठी समुदाय-आधारित वसुली यंत्रणा देखील मजबूत केल्या.

ही कामगिरी केवळ आकडेवारी नाही तर हे त्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे जेव्हा महिलांना विश्वास, साधने आणि संधी देऊन सक्षम केले जाते तेव्हा प्रकट होणाऱ्या त्यांच्या क्षमतेचा उत्सव आहे. या यशाचा उपयोग करून आपण ग्रामीण भारत अधिक समावेशक आणि सक्षम बनवू शकतो.

 

* * *

सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149831)