पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2025 12:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मनसा देवी मंदिराच्या मार्गावर चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावरच्या शोक संदेशात म्हटले आहे की, उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मनसा देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख झाले आहे. या दुर्दैवी घटनेत ज्या कुटुंबांना आपले आप्तजन गमवावे लागले, त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. जखमींची प्रकृती लवकर स्थिर व्हावी, हीच प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. – पंतप्रधान @narendramodi
***
शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2149045)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam