पंतप्रधान कार्यालय
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2025 8:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
'एक्स' या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, देशवासियांना कारगिल विजय दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
हा दिवस भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अद्वितीय शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देतो, ज्यांनी राष्ट्राच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे मातृभूमीवरचे प्रेम आणि बलिदान प्रत्येक पिढीसाठी सदैव प्रेरणादायक ठरेल.
जय हिंद!
***
निखिल देशमुख/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2148762)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam