गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराबद्दल (एफटीए) केले अभिनंदन
Posted On:
24 JUL 2025 8:28PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर (एफटीए ) स्वाक्षरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
‘एक्स’ या समाज माध्यमावरच्या एका संदेशात, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी लिहिले आहे, "भारताने जागतिक व्यापारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि आशेचा क्षण आहे. ऐतिहासिक भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. हा करार पंतप्रधान मोदी यांच्या लोक-केंद्रित व्यापार धोरणाचे प्रतीक असून आपल्या शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नवीन युगाचा प्रारंभ करणारा आहे. या करारामुळे 95% कृषी निर्यातीवरील शुल्क माफ करण्यात येणार आहे. यासोबतच 99% सागरी उत्पादनांच्या निर्यातीवर शून्य करामुळे आपल्या मत्स्यव्यावसायिकांनाही मोठा लाभ मिळणार आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या संकल्पनेला चालना देणारा हा करार आहे. त्याचबरोबर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत नेऊन आपले कारागीर, विणकर, कापड, चामडे, पादत्राणे, रत्ने आणि दागदागिने तसेच खेळणी बनवणाऱ्यांना नव्या उंचीवर नेणारा हा करार त्यांच्या क्षमतेला एक नवीन परिमाण देणारा ठरणार आहे.”
***
SuvarnaBedekar/ShraddhaMukhedkar/DineshYadava
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148231)