माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1.55 लाखांहून अधिक प्रकाशने आणि 908 खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसह भारतातील सक्रीय प्रसारमाध्यम परिसंस्थेचा विस्तार


डीडी फ्री डिश आणि बाइंड योजनेमुळे प्रसार भारतीची प्रादेशिक व्याप्ती वाढली

अनेक प्रादेशिक भाषांचा समावेश असलेल्या 92 खाजगी आणि 50 डीडी वाहिन्या डीडी फ्री डिशवर उपलब्ध

Posted On: 23 JUL 2025 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2025

 

भारतात एक अतिशय सक्रीय प्रसारमाध्यम परिसंस्था आहे, ज्यामध्ये अलिकडच्या काळात खालीलप्रमाणे वाढ झाली आहे:

  • प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडील नोंदणीकृत प्रकाशनांची संख्या 2014-15 मध्ये 1.05 लाख होती, ती 2024-28 मध्ये 1.55 लाख झाली आहे.
  • खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांची संख्या देखील 2014-15 मधील 821 वरून 2024-25 मध्ये 908 झाली आहे.

आजपर्यंत, डीडी फ्री डिशवर 92 खाजगी वाहिन्या आणि 50 दूरदर्शन वाहिन्या उपलब्ध आहेत. खाजगी आणि डीडी अशा दोन्ही प्रकारच्या वाहिन्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये कार्यरत असल्याने देशभरातील बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहे.

प्रसार भारतीच्या महाजालाचा देशभरातील विस्तार ही ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (बाईंड) योजना 2021-26 अंतर्गत सुरू असलेली एक सततची प्रक्रिया आहे. हिमाचल प्रदेशात या योजनेअंतर्गत तीन ट्रान्समीटर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मंडीमध्ये 5 किलोवॅटचा ट्रान्समीटर तर चंबा आणि धरमपूरमध्ये प्रत्येकी 1 किलोवॅट एफएम ट्रान्समीटरचा समावेश आहे.

ही माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज लोकसभेत सादर केली.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147607)