माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशभरातील आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांचे आधुनिकीकरण प्रगतीपथावर
Posted On:
23 JUL 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
सरकारने सर्व राज्यांमधील आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांचे (डीडीके) आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
केंद्रीय क्षेत्र योजना - प्रसारण पायाभूत सुविधा आणि महाजाल विकास (बी आय एन डी) अंतर्गत केंद्रांचे उन्नतीकरण केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक प्रसारण मजबूत करण्यासाठी बिहारसह देशभरातील प्रमुख उन्नतीकरणाचा समावेश आहे.
2021-26 या कालावधीसाठी एकूण 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेचा भर पुढील गोष्टींवर आहे:
- प्रसारण उपकरणांचे डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण
- जुन्या प्रणाली बदलणे
- स्टुडिओ आणि ट्रान्समीटर पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण
- नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल कार्यप्रवाहांचा वापर
बिहारमध्ये प्रसारण पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विविध प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यात आकाशवाणी केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी 64.56 कोटी रुपये आणि दूरदर्शन केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी 4.31 कोटी रुपये समाविष्ट आहेत.
ही माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण व संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज लोकसभेत सादर केली.
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147597)