नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेमध्‍ये ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक मंजूर; 169 वर्षे जुन्या वसाहतवादी काळातील कायद्यामध्‍ये होवू शकणार परिवर्तन


राज्यसभेने महत्त्वाच्या नौवहन सुधारणांना मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक केले सादर

Posted On: 21 JUL 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जुलै 2025

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेने ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींच्या मान्यतेचा मार्ग मोकळा केला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (एमओपीएसडब्ल्यू) मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडल्यावर भारताच्या सागरी क्षेत्रासाठीचा हा महत्त्वाचा क्षण ठरला.  सागरी वाहतूक, नियम यांच्याबाबतचे दस्तावेज तयार करणे, व्यवहार करणे, यासंदर्भातील महत्वाचे विधेयक आहे.

या विधेयकाला लोकसभेने आधीच मंजुरी दिली असून आता राष्ट्रपतींच्या संमतीची प्रतीक्षा आहे, त्यानंतर हे विधेयक कायद्यात परिवर्तीत होईल. एकदा लागू झाल्यानंतर हा कायदा 169 वर्षांपूर्वीच्या वसाहतवादी काळातील भारतीय लॅडींग कायदा, 1856 ची जागा घेईल. यामुळे भारतात आधुनिक, सुलभीकृत आणि सागरी नौवहन दस्तावेजीकरणासाठीचा  जागतिकदृष्ट्या संरेखित कायदेशीर  आराखडा निर्माण होईल.

हा नवीन कायदा जुन्या क्लिष्ट शब्दावलीच्या जागी स्पष्ट तसेच व्यापार-स्नेही भाषेचा वापर करून वाहक, शिपर्स तसेच कायदेशीर धारकांसाठी अधिकार आणि दायित्वे सुव्यवस्थित करतो; खटल्यांची जोखीम कमी करण्यासाठी नौवहन विषयक दस्तावेजीकरणातील अस्पष्टता कमी करतो तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अनुसार जुळवणी करून जागतिक व्यापार क्षेत्रात भारताची स्थिती मजबूत बनवणारा हा कायदा आहे.

कालबाह्य कायद्याला नवे नाव देऊन हे विधेयक भारताच्या वसाहतवादी भूतकाळापासून दूर जाण्याच्या निर्णायक खेळीचे प्रतीक ठरते. हे विधेयक कायदेशीर भाषेला सोपे रूप देते, गुंतागुंतीच्या तरतुदींची पुनर्रचना करते आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी निर्देश जरी करण्याची क्षमता सरकारला देणारे कलम अंतर्भूत करते.  

राज्यसभा सदस्यांना हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन करत केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, “‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक आमच्या संविधानात्मक मूल्यांचे दर्शन घडवते आणि कालबाह्य वसाहतवादी कायद्याला बदलून त्या जागी आधुनिक, सुलभतेने उपलब्ध चौकट आणण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरते. आपले सागरी क्षेत्र वेगाने विस्तारत असल्यामुळे ही सुधारणा व्यापार करण्यातील सुलभतेला चालना देईल, वादांचे प्रमाण कमी करेल आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताची स्थिती बळकट करेल. असे म्हणतात की – जो लाटांवर राज्य करतो, तो जगावर राज्य करतो’. याला अनुसरून आता आघाडीवर जाऊन भारताने जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.”
 

सुवर्णा बेडेकर/संजना ‍चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2146647)