युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

काशी घोषणापत्राच्या शुभारंभाने युवा आध्यात्मिक परिषदेचा समारोप


काशी घोषणापत्राद्वारे, युवा नेतृत्वाअंतर्गत व्यसनमुक्ती चळवळीचा 5 वर्षीय पथदर्शी आराखडा निश्चित

या महाअभियानाविषयी डॉ. मांडवीय म्हणतात

Posted On: 20 JUL 2025 4:32PM by PIB Mumbai


 

वाराणसी इथल्या रूद्राक्ष आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा संकल्पनेवर आधारित युवा आध्यात्मिक परिषदेचा समारोप काशी घोषणापत्राच्या औपचारीक स्वीकृतीसह आज झाला. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित या  परिषदेत 600 युवा नेते, 120हून अधिक आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षण तज्ज्ञ आणि कार्यक्ष तज्ज्ञ सहभागी झाले होते. भारताच्या 2047 पर्यंत अमली पदार्थमुक्त समाजाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासातील निर्णायक क्षण म्हणून हा कार्यक्रम होता.

या परिषदेत, अमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रमुख पैलूंवर चर्चा करणारी चार खुली सत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्याचे (अमली पदार्थ सेवनाचे)मानसशास्त्रीय आणि सामाजिक परिणाम, अमली पदार्थ तस्करी आणि पुरवठा साखळीचे तंत्र, तळागाळापर्यंत जनजागृती मोहिमेसाठीची रणनीती आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचा पुनर्वसन आणि प्रतिबंध यांमधील भूमिका यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या चर्चासत्रांमुळे भारताच्या सांस्कृतिक ज्ञान आणि युवा नेतृत्व यामध्ये रुजलेल्या अमली व्यसनाविरोधात  सहयोगी कृती करण्यासाठी दूरदर्शी वचनबद्धता व्यक्त करणाऱ्या काशी घोषणापत्राचा पाया रचला गेला.

या परिषदेत बोलताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी बोलतानाः "गेल्या तीन दिवसांत आम्ही विविध विषयानुरूप सत्रांमध्ये सखोल चिंतन केले. या सखोल चिंतनावर आधारीत असलेले काशी घोषणापत्र केवळ दस्तऐवज म्हणून नव्हे तर भारताच्या युवा शक्तीसाठी एक सामायिक संकल्प म्हणून तयार झाले आहे."  या चर्चासत्रांमुळे, विविध विचारांना एका राष्ट्रीय दिशेने एकजूट करत काशी घोषणापत्राचा बौद्धिक आणि नैतिक पाया घातला गेला. काशी घोषणापत्र आज औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, जे अमली पदार्थांचे सेवनाला बहुआयामी सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक आव्हान म्हणून हाताळण्यासाठी राष्ट्रीय सहमतीला मान्यता देते आणि संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीकोनाचे आवाहन करते. व्यसनांना रोखण्यासाठी तसेच व्यसनमुक्तीला पाठिंबा देण्यासाठी आणि संयमाची राष्ट्रीय संस्कृती वृद्धीसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रयत्नांच्या एकात्मिकतेवर भर देण्यात आला आहे. बहुमंत्रालयीन समन्वयासाठी, संयुक्त राष्ट्रीय समितीची स्थापना, वार्षिक प्रगती अहवाल आणि प्रभावित व्यक्तींना समर्थित सेवांशी जोडण्यासाठीचा एक राष्ट्रीय व्यासपीठ यांसारख्या संस्थात्मक यंत्रणा प्रस्तावित आहेत.

आध्यात्मिक पायावर शिखर परिषदेची उभारणी करताना, डॉ. मांडवीय पुढे म्हणालेः "भारताच्या आध्यात्मिक ताकदीने नेहमीच भारताला त्याच्या संकटामधून मार्ग दाखवला आहे. त्यामुळेच आध्यात्मिक संस्थांनी आता विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा निर्माण करण्यासाठी नेतृत्व केले पाहिजे. या महा अभियानाचा कणा म्हणून त्यांनी काम केले पाहिजे."

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2146276)