पंतप्रधान कार्यालय
ऐतिहासिक अंतराळ मोहिमेवरून परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2025 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2025
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करण्याच्या ऐतिहासिक मोहिमेवरून पृथ्वीवर परतलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेली कामगिरी देशाच्या अंतराळ संशोधनाच्या प्रवासात एक महत्त्वाची घटना आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः
“अंतराळातील ऐतिहासिक मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परतणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मी संपूर्ण देशासोबत स्वागत करत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी, त्यांची समर्पित वृत्ती, धैर्य आणि अग्रणी राहण्याच्या भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. गगनयान- या मानवी अंतराळ मोहिमेच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
* * *
सोनाली काकडे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2144881)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam