माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मध्य प्रदेशमध्ये प्रसारण सेवेला चालना: केंद्र सरकार ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत उज्जैनमध्ये आकाशवाणी केंद्र स्थापन करणार
Posted On:
08 JUL 2025 8:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2025
माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे स्वागत केले.

या बैठकीत मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील विकास उपक्रमांशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. उभय नेत्यांनी माध्यमांची पोहोच, सार्वजनिक संप्रेषण आणि प्रसारण पायाभूत सुविधांसह प्रमुख क्षेत्रांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहकार्य मजबूत करण्याच्या संधींबाबत चर्चा केली. आकाशवाणी आणि दूरदर्शन सारखी केंद्रीय माध्यम व्यासपीठे मध्य प्रदेशातील विकास गाथा अधिक प्रभावीपणे कशा प्रकारे पोहोचवू शकतील याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
उज्जैनमध्ये नवीन आकाशवाणी केंद्र

या बैठकीत उज्जैनमध्ये नवीन आकाशवाणी केंद्र स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली, ज्याला केंद्राच्या प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास (बीआयएनडी) योजनेअंतर्गत सहाय्य दिले जाईल.
मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सरकारच्या विकासाच्या दृष्टिकोनाला चालना देण्यात संस्थात्मक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143255)