माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप अ‍ॅक्सेलेरेटर प्लॅटफॉर्म वेव्हेक्स द्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रिअल टाईम बहुभाषिक अनुवाद विषयक ‘भाषासेतू’ विकसित करण्यासाठी स्टार्टअप्सना आमंत्रण

Posted On: 30 JUN 2025 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2025

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रमुख स्टार्टअप अ‍ॅक्सेलेरेटर कार्यक्रम वेव्हेक्स अंतर्गत वेव्हेक्स स्टार्टअप चॅलेंज 2025 ची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे देशभरातील स्टार्टअप्सना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बहुभाषिक अनुवाद उपाय तयार करण्यासाठी राष्ट्रीय हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘भाषासेतू – रिअल-टाइम लँग्वेज टेक फॉर भारत’ या शीर्षकाखाली, या आव्हानाचा (चॅलेंज) उद्देश भाषांतर, लिप्यंतरण आणि व्हॉइस लोकलायझेशन या क्षमतेसह किमान 12 प्रमुख भारतीय भाषांमध्ये कार्यक्षम अशा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपकरणांच्या निर्मितीला चालना देणे हा आहे. या उपक्रमामागील हेतू म्हणजे समावेशक, प्रवेशयोग्य आणि भावना-समजणाऱ्या संवादतंत्रज्ञानाची वाढ घडवून आणणे.

या चॅलेंजमध्ये किमान पात्रता निकष नाहीत, त्यामुळे कोणत्याही टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्सना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. स्टार्टअप्सना ओपन-सोर्स किंवा कमी किमतीच्या एआय मॉडेल्स वापरून  मापन योग्य आणि परवडणारे उपाय सादर करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र सर्वसामान्य वापरासाठी परवडणारी आणि व्यावहारिक असल्यास स्वामित्व उपाय सुद्धा यासाठी सादर करता येतील.

विजेत्या स्टार्टअप ला वेव्हेक्स एक्सेलेटर अंतर्गत इनक्युबॅशन असे सहाय्य केले जाईल. ज्यामध्ये मार्गदर्शन, कार्यक्षेत्र आणि विकास सहाय्य यांचा समावेश असेल.जोपर्यंत अंतिम उत्पादन तयार होऊन अंमलात येईपर्यंत  हे सहाय्य मिळणार आहे. नोंदणी आजपासून, 30 जून 2025 पासून सुरू असून, प्रोटोटाइप सादर करण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2025 आहे. इच्छुक स्टार्टअप्स https://wavex.wavesbazaar.com या अधिकृत वेव्हेक्स पोर्टलवर अर्ज करू शकतात.

वेव्हेक्स विषयी

वेव्हेक्स हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला विशेष स्टार्टअप अ‍ॅक्सेलेरेटर प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश माध्यम, मनोरंजन आणि भाषा-तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. मे 2025 मध्ये मुंबईत झालेल्या वेव्हज समिटमध्ये, वेव्हेक्स ने 30 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पना सादर करण्याची संधी दिली होती, ज्या अंतर्गत त्यांनी शासकीय यंत्रणा, गुंतवणूकदार आणि उद्योगातील नेत्यांशी थेट संवाद साधला. वेव्हेक्स हा लक्ष्यित हॅकाथॉन, इन्क्यूबेशन, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण यांच्या माध्यमातून नवकल्पनांना सातत्याने पाठबळ देत आहे.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140989)