पंतप्रधान कार्यालय
तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2025 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
"तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आग लागल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मला अतिव दु:ख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.
प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140772)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam