राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 30 जून ते 1 जुलै दरम्यान उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2025 5:20PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.
30 जून रोजी, राष्ट्रपती बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या अकराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहातील. त्याच दिवशी त्या गोरखपूरच्या एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहाणार आहेत.
1 जुलै रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते, गोरखपूर येथे महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन होईल. राष्ट्रपती महायोगी गोरखनाथ विद्यापीठालाही भेट देतील, त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यापीठाच्या सभागृहाचे, शैक्षणिक इमारतीचे आणि पंचकर्म केंद्राचे उद्घाटन होईल याचबरोबर मुलींच्या नव्या वसतिगृहाची पायाभरणी देखील होईल.
***
N.Chitale/VSS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140617)
आगंतुक पटल : 35