पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 जून रोजी नवी दिल्ली येथे आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
हा कार्यक्रम आदरणीय जैन आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक आचार्य विद्यानंद जी महाराज यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त सरकारद्वारे भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रीय श्रद्धांजलीची समारंभाची औपचारिक सुरुवात आहे. वर्षभर चालणाऱ्या या समारंभात देशभरात सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा समावेश असेल, ज्याचा उद्देश आचार्य विद्यानंद जी महाराज यांचे जीवन आणि वारशाचा उत्सव साजरा करणे आणि त्यांच्या संदेशाचा प्रसार करणे आहे.
आचार्य विद्यानंद जी महाराज यांनी जैन तत्वज्ञान आणि नीतिमत्तेवर 50 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी भारतातील प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच विशेषतः प्राकृत, जैन तत्वज्ञान आणि अभिजात भाषांमध्ये शिक्षणासाठी काम केले.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140297)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam