युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राजस्थानमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025’ च्या आयोजनाची क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची घोषणा
Posted On:
25 JUN 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2025
पोर्णिमा विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठ संयुक्तपणे नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (केआययूजी)2025 चे आयोजन करणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची ही पाचवी आवृत्ती असेल.
या बहुक्रीडा स्पर्धेमध्ये 200 पेक्षा अधिक विद्यापीठांमधून 4,000 हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. मागील आवृत्त्यांप्रमाणे, केआययूजी 2025 च्या कार्यक्रमात किमान 20 क्रीडा प्रकार असतील. केआययूजी 2024 मध्ये चंदीगड विद्यापीठाने टीम चॅम्पियनशिप जिंकली होती, जी आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.
केआययूजी 2024 मध्ये ऍथलेटिक्समध्ये आठ नवीन खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स विक्रम प्रस्थापित करण्यात आले, यापैकी पाच विक्रम पुरुषांनी प्रस्थापित केले. डॉ. मांडविया म्हणाले, “जगभरात विद्यापीठ खेळाडू बहुक्रीडा स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवतात. राजस्थानमध्ये खेळाडूंनी त्यांच्या सर्वोच्च क्षमतेने खेळ करावा अशी अपेक्षा आहे.”
उत्तर पूर्व भारतात प्रथमच झालेल्या 11 दिवसांच्या केआययूजी 2024 मध्ये एकूण 770 पदके देण्यात आली – 240 सुवर्ण, 240 रौप्य, आणि 290 कांस्य. या स्पर्धेत 200 हून अधिक विद्यापीठांमधून सुमारे 4,500 खेळाडूंनी 20 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139727)