राष्ट्रपती कार्यालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'विंग्ज टू अवर होप्स' आणि 'आशाओं की उडान' या पुस्तकांच्या दुसऱ्या खंडाची पहिली प्रत भेट दिली
Posted On:
23 JUN 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, यांच्या उपस्थितीत आज (23 जून 2025) राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'विंग्ज टू अवर होप्स' आणि 'आशाओं की उडान' या पुस्तकांच्या दुसऱ्या खंडाची पहिली प्रत भेट दिली. यावेळी प्रकाशन संचालनालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकाशन संचालनालयाने प्रकाशित केलेल्या 'विंग्स टू अवर होप्स' आणि 'आशाओं की उडान' या पुस्तकांचा दुसरा खंड म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या वर्षात केलेल्या निवडक भाषणांचा संग्रह आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात या पुस्तकांचे औपचारिक प्रकाशन केले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 51 निवडक भाषणांचा समावेश असून त्यांचे 11 विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे: राष्ट्राला संबोधन, शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाला चालना, कर्मयोगींना निःस्वार्थ सेवेसाठी प्रेरणा , सशस्त्र दल- देशाचा अभिमान, नागरिकांच्या सक्षमीकरणात प्रशासनाची भूमिका, उल्लेखनीय कामगिरीचा गौरव, जागतिक संबंध प्रस्थापित करणे आणि मजबूत करणे, आपला सांस्कृतिक वारसा साजरा करणे, शेतीमधील नवोन्मेश: भारताच्या विकासाला चालना, स्वतःला निसर्गाशी एकरूप करणे, आणि महिला सक्षमीकरण: अडथळे दूर करणे.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139075)