माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नागरिकांना #BadaltaBharatMeraAnubhav या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्यासाठी केले आमंत्रित
Posted On:
20 JUN 2025 5:21PM by PIB Mumbai
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, MyGov च्या सहकार्याने सर्व नागरिकांना ‘बदलता भारत माझा अनुभव’ या देशव्यापी सर्जनशील स्पर्धांच्या उत्साहवर्धक मालिकेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाची, अभूतपूर्व विकासाची आणि परिवर्तनकारी प्रशासनाची 11 वर्षे साजरी करण्यासाठी ही मोहीम आहे. ‘Viksit Bharat @2047’ या दृष्टिकोनातून प्रेरित ही मोहीम, जीवनाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना भारताच्या वेगाने होणाऱ्या विकास आणि परिवर्तनाबद्दलचे त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि सर्जनशील विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. तळागाळातील सहभागापासून ते सर्जनशील प्रदर्शनांपर्यंत, हा उपक्रम प्रत्येक भारतीयाचा सहभाग वाढवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या स्पर्धा MyGov पोर्टलवर खुल्या आहेत आणि 9 जुलै, 2025 रोजी बंद होतील.

गेल्या 11 वर्षांतील देशाचे उल्लेखनीय परिवर्तन आणि 'विकसित भारत' बनण्याच्या दिशेने देशाने वेगाने केलेली प्रगती साजरी करणे आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांसाठी विविध प्रकारच्या आणि महत्त्वाच्या संकल्पना निवडण्यात आल्या आहेत, ज्यात शेतकरी कल्याण, नारी शक्ती, जीवनमान सुलभता, व्यवसाय सुलभता, राष्ट्र प्रथम - राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण तसेच भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता बनणे, अशा अनेक विषयांचा समावेश आहे. म्हणूनच, भारतातील सर्व नागरिकांना, ज्यात संशोधक, व्लॉगर्स, लेखक, ब्लॉगर्स, इन्फ्लुएंसर्स आणि उत्साही कथाकार यांचा समावेश आहे, त्यांना #BadaltaBharatMeraAnubhav या हॅशटॅगचा वापर करून या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आणि त्यांच्या परिवर्तनकारी प्रवासाचे स्वतःच्या अनोख्या आणि प्रभावी पद्धतीने प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या पाच सर्जनशील स्पर्धा खालीलप्रमाणे आहेतः
इन्स्टाग्राम रील मेकिंग कॉम्पिटिशन #BadaltaBharatMeraAnubhav
देशातील क्रिएटर्सना डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि स्किल इंडिया यांसारख्या संकल्पनांवर आधारित 30-60 सेकंदांच्या आकर्षक रील्स बनवण्यासाठी आमंत्रित केले आहे.
बक्षिसे:
विजेता: ₹50,000
उपविजेते: ₹25,000 आणि ₹10,000
उत्तेजनार्थ विजेते (7): प्रत्येकी ₹5,000
सहभाग घेण्यासाठी: https://www.mygov.in/task/badalta-bharat-mera-anubhav-instagram-reel-contest/?target=inapp&type=task&nid=359974
YouTube शॉर्ट्स चॅलेंज #BadaltaBharatMeraAnubhav
बदलत्या भारताचा भाव प्रतिबिंबित करणारे, जीवनातील हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी क्षण सामाईक करण्यासाठी नागरिकांना आमंत्रित केले आहे. सुधारणा केलेल्या रेल्वे स्टेशनची भेट असो, स्थानिक उपक्रम असो किंवा सांस्कृतिक उत्सव असो – प्रत्येक कथेला महत्त्व आहे.
बक्षिसे:
विजेता: ₹50,000
उपविजेते: ₹25,000 आणि ₹10,000
उत्तेजनार्थ विजेते (7): प्रत्येकी ₹5,000
https://www.mygov.in/task/badalta-bharat-mera-anubhav-youtube-shorts-challenge/?target=inapp&type=task&nid=359963
ब्लॉगभारत चॅलेंज: परिवर्तनावर लिहा
ही स्पर्धा भारतातील लेखक, पत्रकार, विद्यार्थी आणि विचारवंतांसाठी भारताच्या परिवर्तन प्रवासावर त्यांचे निरीक्षण आणि विश्लेषण ब्लॉग स्वरूपात (800-1200 शब्दांत) मांडण्याची संधी देते.
बक्षिसे:
विजेता: ₹50,000
उपविजेते: ₹25,000 आणि ₹10,000
उत्तेजनार्थ विजेते (7): प्रत्येकी ₹5,000
https://www.mygov.in/task/badalta-bharat-mera-anubhav-blog-writing-contest/
विकसित भारत प्रश्नमंजुषा 2025 : भारताच्या धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांमधील वाढ आणि विकासाचे टप्पे याबद्दल नागरिकांच्या जागरूकतेची चाचणी घेण्यासाठी हा एक ज्ञान-आधारित चॅलेंज आहे.
बक्षिसे:
प्रथम स्थान : ₹1 लाख
द्वितीय स्थान: ₹75,000
तृतीय स्थान: ₹50,000
इतर 300 पेक्षा जास्त विजेते: प्रत्येकी ₹2,000 आणि ₹1,000
प्रत्येक सहभागीला डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
https://quiz.mygov.in/quiz/viksit-bharat-2025-quiz/
शॉर्ट AV चॅलेंज – नव्या भारताची कहाणी #BadaltaBharatMeraAnubhav
नवोदित चित्रपट निर्माते, व्हिडिओ संपादक आणि विद्यार्थ्यांना शॉर्ट AV फिल्म्स (10 मिनिटांपर्यंत) सादर करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे, ज्या कथाकथन, माहितीपट किंवा सिनेमॅटिक दृश्यांद्वारे भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासाच्या कथांना जिवंत करतील.
बक्षिसे:
विजेता: ₹3 लाख
उपविजेते: ₹2 लाख आणि ₹1 लाख
उत्तेजनार्थ विजेते (2): प्रत्येकी ₹20,000
सहभाग घेण्यासाठी: https://www.mygov.in/task/short-av-challenge-story-new-india/?target=inapp&type=task&nid=360007
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2138185)