उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 JUN 2025 11:40AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर राष्ट्रपतींचे अभिष्टचिंतन करताना ते म्हणाले:
"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सामान्य पार्श्वभूमी ते सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंतचा त्यांचा असाधारण प्रवास, त्यांची विनम्रता, साधेपणा आणि उत्तुंगतेचे प्रतीक आहे ज्यातून  आपल्या लोकशाहीची खरी भावना प्रतिबिंबित होते. त्यांनी आमदार, राज्यपाल आणि आता सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्रपती म्हणून सार्वजनिक सेवेतील त्यांच्या प्रवासात सातत्याने सर्वोच्च आदर्श  स्थापित केले आहेत ,  हा अनुकरणीय वारसा आहे.
 राष्ट्रपती भवनात काल त्यांना प्रत्यक्ष भेटून  शुभेच्छा देण्याचे  भाग्य मला  लाभले.  हा वाढदिवस त्यांना उत्तम  आरोग्य,   सुख  आणि आनंद घेऊन येवो आणि ईश्वर  त्यांना आपल्या देशाची सेवा करण्यासाठी निरंतर  शक्ती  प्रदान करो ."

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2137913)