पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2025 11:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांची झाग्रेब येथे भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. लोकशाहीची सामायिक मूल्ये , कायद्याचे राज्य आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्याच्या सामायिक ध्येयावर आधारित दोन्ही देशांमधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांप्रति वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. संरक्षण, स्टार्ट-अप, क्रीडा आणि नवोन्मेष यासारख्या नवीन क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या वैविध्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला क्रोएशियाने दिलेला भक्कम पाठिंबा आणि एकजुटीबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिलानोविच यांचे आभार मानले. उभय नेत्यांनी दोन्ही देशांना घट्ट बांधणाऱ्या अनेक शतकांपासूनच्या सांस्कृतिक संबंधांवरही चर्चा केली.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. अलिकडच्या काळात भारत-युरोपियन महासंघ यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ झाली आहे आणि यामुळे भारत-क्रोएशिया संबंधांचे महत्व अनेक प्रकारे वाढेल असे त्यांनी नमूद केले.
भारत-क्रोएशिया संबंधांची पूर्ण क्षमता साकारण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137565)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam