आयुष मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        इतिहास घडला : ‘योग संगम’ कार्यक्रमासाठीची नोंदणीने ओलांडला 4 लाखांचा टप्पा
                    
                    
                        
1 लाखाहून अधिक योग स्थळांसह राजस्थान आघाडीवर
                    
                
                
                    Posted On:
                18 JUN 2025 12:46PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 18 जून 2025
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रमुख कार्यक्रम योग संगमसाठीच्या नोंदणीने 4 लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे पारंपारिक आरोग्य पद्धतींमधून जागतिक स्तरावर सर्वसमावेशक आरोग्याचे मार्गदर्शन करणारा देश म्हणून भारताने आपली भूमिका अधिक दृढ केली आहे. भारतात प्रथमच एखाद्या कार्यक्रमासाठी इतक्या व्यापक प्रमाणात नोंदणी झाल्याची बाब उल्लेखनीय आहे.
येत्या 21 जून रोजी, देशभरातील लाखो ठिकाणी एकाच वेळी ऐतिहासिक समन्वयित योग सत्र आयोजित करण्यात येणार असून भारताच्या आरोग्य प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या राष्ट्रीय मोहिमेचा सर्वात मोठा कार्यक्रम आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे पार पडणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 5 लाखांहून अधिक नागरिक सामील होणार आहेत.
21 जून रोजी सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत होणारा ‘योग संगम’ हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सामूहिक योग सत्रांपैकी एक ठरणार आहे, ज्यात देशभरातील लाखो संस्था, संघटना आणि समूह  एकत्रितपणे सामील होणार आहेत.
योग संगम साठी  राजस्थानमध्ये सर्वाधिक 1,38,033 संस्था- संघटनांची नोंद झाली आहे.  
त्याखालोखाल -
आंध्र प्रदेश: 1,38,033
उत्तर प्रदेश: 1,01,767
मध्य प्रदेश: 26,159
गुजरात: 19,951
हिमाचल प्रदेश: 12,000
या वाढत्या सहभागातून यंदाच्या  'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' - या संकल्पनेबद्दलचा प्रचंड उत्साह दिसून येत असून ही संकल्पना योगाला जागतिक शाश्वतता आणि व्यक्तिगत आरोग्याशी जोडणारी आहे.
योग संगम' मध्ये सहभाग कसा नोंदवायचा?
संकेतस्थळ भेट द्या: https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
आपली संस्था/समूहाची नोंदणी करा.
21 जून रोजी सकाळी 6:30 ते 7 दरम्यान पंतप्रधानांचे थेट भाषण पहा आणि त्यानंतर 7 ते 7:45 दरम्यान योग सत्रात  सहभागी व्हा,
आपल्या योग सत्राचाही व्हिडिओ अपलोड करा आणि अधिकृत प्रशस्तीपत्र प्राप्त करा.
S.Kane/R.Dalekar/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2137175)
                Visitor Counter : 4
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Nepali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam