पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस III हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2025 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2025
सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार -"ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III" देऊन गौरवण्यात आले.
140 कोटी भारतीयांच्या वतीने हा सन्मान स्वीकारताना, पंतप्रधानांनी सायप्रसचे अध्यक्ष,सरकार आणि जनतेचे मनापासून आभार मानले. त्यांनी हा पुरस्कार भारत आणि सायप्रसमधील दीर्घकालीन जिव्हाळ्याच्या संबंधांप्रती समर्पित केला,जे सामायिक मूल्यांवर आणि परस्पर विश्वासाने जोडले गेले आहेत. हा पुरस्कार भारताच्या "वसुधैव कुटुंबकम" किंवा "जग एक कुटुंब आहे" या प्राचीन तत्वज्ञानाची ओळख करून देणारा आहे जे तत्वज्ञान जागतिक शांतता आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचे मार्गदर्शक आहे असे त्यांनी पुढे नमूद केले.
भारत आणि सायप्रसमधील भागीदारी मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्याप्रति नव्याने वचनबद्धता दर्शवत पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारला. हा पुरस्कार दोन्ही देशांच्या शांतता, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि समृद्धी यावरील अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136628)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam