पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 13 JUN 2025 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.विजय रुपाणी यांचे काल अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले.मोदी यांनी  रुपाणी यांच्या अतुलनीय कारकिर्दीचा उल्लेख करत राजकोट महानगरपालिकेतील त्यांचा कार्यकाळ, राज्यसभेचे खासदार, गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशा त्यांच्या विविध भूमिकांमधील योगदानाचे स्मरण केले.

एक्सवरील एका थ्रेड पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिले:

“विजयभाई रुपाणी जी यांच्या कुटुंबियांना भेटलो.

विजयभाई आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखत होतो . आम्ही अनेक आव्हानात्मक प्रसंगी खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले. विजयभाई अतिशय नम्र आणि मेहनती  होते, पक्षाच्या विचारसरणीप्रति दृढपणे वचनबद्ध होते. मोठमोठ्या पदांवर काम करताना त्यांनी संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून परिश्रमपूर्वक काम केले.”

“सोपवलेल्या प्रत्येक भूमिकेत, त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले, मग राजकोट महानगरपालिका असो, राज्यसभेचे खासदारपद असो, गुजरात भाजपचे  अध्यक्षपद  असो आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असो.”

“विजयभाई गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आम्ही दोघांनी खूप काम केले. त्यांनी गुजरातच्या विकासाला गती  देण्यासाठी विशेषतः ‘जीवन सुलभता’ वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. आमच्यातील संवाद नेहमीच स्मरणात राहील. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति माझ्या शोकसंवेदना.ओम शांती.”

 

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 


(Release ID: 2136164)