पंतप्रधान कार्यालय
कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
मध्य आशियाई देशांच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना भारत-मध्य आशिया संवादाच्या चौथ्या बैठकीबद्दल माहिती दिली
पंतप्रधानांनी आर्थिक परस्परसंबंध, कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणि नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्याबाबतचा दृष्टीकोन मांडला
सामायिक प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत-मध्य आशिया दरम्यानची मजबूत भागीदारी प्रबळ शक्ती म्हणून काम करेल यावर पंतप्रधानांचा भर
मध्य आशियाई नेत्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला
पंतप्रधानांनी दुसऱ्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेसाठी सर्व मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2025 8:54PM by PIB Mumbai
कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्तपणे भेट घेतली. नवी दिल्ली येथे आज सकाळी झालेल्या भारत-मध्य आशिया संवादाच्या चौथ्या बैठकीत झालेल्या सकारात्मक आणि फलदायी चर्चेची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.
मध्य आशियाई देशांबरोबरचे संबंध हे भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे प्राधान्य राहिले आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. परस्परांच्या जनतेमधील ऐतिहासिक संबंधांवर भर देत, त्यांनी वर्धित आर्थिक अंतर्गत संबंध, विस्तारित कनेक्टिव्हिटी , वर्धित संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणि नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य यावरील आपला दृष्टिकोन मांडला.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत-मध्य आशिया दरम्यानची मजबूत भागीदारी सामायिक प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रबळ शक्ती म्हणून काम करते. मध्य आशियाई परराष्ट्र मंत्र्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला.
पंतप्रधानांनी भारतात होणाऱ्या दुसऱ्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेसाठी सर्व मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
(रिलीज़ आईडी: 2134732)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada