पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम


पंतप्रधानांच्या हस्ते वृक्षारोपण हा 700 किमी लांबीच्या अरवली पर्वतरांगांमधील वनीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा’ भाग

दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमांतर्गत 200 इलेक्ट्रिक बसेसना पंतप्रधान दाखवतील हिरवा झेंडा

Posted On: 04 JUN 2025 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी 5 जून 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क येथे एका विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये पर्यावरणीय देखभाल आणि हरित गतिशीलतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली जाईल.

पंतप्रधान एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वडाचे रोप लावतील. हा 'अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट'चा एक भाग असेल ज्याचा उद्देश 700 किमी लांबीच्या अरवली पर्वतरांगांमध्ये वनीकरण करणे हा आहे.

दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांतील 29 जिल्ह्यांमधील अरवली पर्वतरांगांच्या सभोवतालच्या 5 किमी बफर क्षेत्रात हिरवळ पसरवण्यासाठी हा प्रकल्प एक प्रमुख उपक्रम आहे. वनीकरण, पुनर्वनीकरण आणि जलसंचयांचे पुनर्संचयन करून अरवली पर्वतरांगांची जैवविविधता वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचा उद्देश या प्रदेशातील मातीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील लवचिकता सुधारणे हा देखील आहे. स्थानिक समुदायांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देऊन हा प्रकल्प त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

पंतप्रधान दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमांतर्गत 200 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवतील, ज्यामुळे स्वच्छ शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरणीय संतुलनाप्रती देशाच्या सामूहिक जबाबदारीचे प्रतीक ठरेल.


S.Tupe/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133770)