राष्ट्रपती कार्यालय
साहित्यातील बदलांविषयी राष्ट्रपती भवनात साहित्य संमेलनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2025 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2025
साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन 29 आणि 30 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात साहित्यातील बदलांविषयी साहित्य संमेलनाचे आयोजन करणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 29 मे 2025 रोजी या संमेलनाचे उद्घाटन होईल. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि देशभरातील साहित्यिक या संमेलनात उपस्थित राहतील.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन - स्ट्रेट फ्रॉम द हार्ट; भारतातील स्त्रीवादी साहित्य: नवीन मार्ग बनवणे; साहित्यात बदल विरुद्ध बदलाचे साहित्य; आणि जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याचे नवीन दिशानिर्देश अशा विविध विषयांवर विविध सत्रे होतील. संमेलनाचा समारोप देवी अहिल्याबाई होळकर यांच्या गाथेने होईल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2132142)
आगंतुक पटल : 15