गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाईत सुरक्षा दलाच्या जखमी झालेल्या जवानांची दिल्लीतील एम्स येथे घेतली भेट
गृहमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना देशाला त्यांच्यावर असलेल्या विश्वास आणि अभिमानाची दिली ग्वाही
Posted On:
15 MAY 2025 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाईत जखमी झालेल्या सुरक्षा दल जवानांची भेट घेतली. या कारवाईत 31 नक्षलवादी ठार झाले.
आमचे सुरक्षा दल त्यांच्या शौर्याने नक्षलवादाच्या खुणा पुसून टाकत आहेत, असे एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात अमित शाह यांनी लिहिले आहे. आज त्यांनी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या कारवाईत 31 नक्षलवादी ठार झाले झाले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या सुरक्षा दल कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि राष्ट्राला त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची आणि अभिमानाची ग्वाही दिली.
या शूर सैनिकांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सलग 21 दिवस मोहीम राबवली यात 31 नक्षलवादी ठार झाले, असे अमित शाह म्हणाले. संपूर्ण देशाला या सैनिकांच्या शौर्याचा आणि धाडसाचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128982)