पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अँथनी अल्बानीज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


Posted On: 03 MAY 2025 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अँथनी अल्बानीज यांचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.

X वरील एका पोस्टमध्ये ते म्हणतात:

"ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल तुमच्या शानदार विजयासाठी आणि पुन्हा एकदा या पदी विराजमान होणारे @AlboMP यांचे हार्दिक अभिनंदन! तुम्हाला मिळालेला हा जबरदस्त जनादेश तुमच्या नेतृत्वावरील ऑस्ट्रेलियाच्या जनतेला असलेल्या कायमस्वरूपी विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि आशिया-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी उभय देशांचा सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे."

 

* * *

N.Chitale/Parnika/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126605) Visitor Counter : 20