माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ऍनिमे ऍसेन्डिंगः वेव्हज 2025 मध्ये विविध तज्ञांनी जागतिक कथाकथनाच्या पद्धती आणि उद्योगाच्या वाढीची उलगडली गुपिते
धाडसी कल्पनांना व्यापक प्रमाणात राबवण्याची एक अनोखी क्षमता भारतामध्ये आहे, ज्यांना इतरत्र यश मिळालेले नाहीः जेरेमी लिम, जीएफआर फंड
पडद्यामागील द्रष्टी व्यक्तिमत्वेः वेव्हज 2025 मध्ये सिनेमॅटिक ब्रह्मांडात ‘व्हीएफएक्स’च्या भवितव्यावर खुमासदार चर्चा
भारत ‘व्हीएफएक्स’ उद्योगात महासत्ता बनेल आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘वेव्हज’ हा अतिशय उत्तम उपक्रम
Posted On:
01 MAY 2025 11:15PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पहिल्यावहिल्या वेव्हज 2025 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, भारतातील AVGC (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम्स आणि कॉमिक्स) क्षेत्रावर सखोल चर्चा घडवून आणणाऱ्या माहितीपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले.
“ऍनिमे ऍसेन्डिंगः अनलॉकिंग ग्लोबल पोटेन्शियल इन स्टोरीटेलिंग, फॅनडम अँड इंडस्ट्री ग्रोथ” नावाच्या एका सत्रामध्ये जपानी आणि भारतीय ऍनिमेशन उद्योगातील दिग्गज एकत्र आले. त्यांनी ऍनिमेची उत्क्रांती, भावनिक गाभा आणि जागतिक कक्षा या विषयांशी संबंधित चर्चा केली. यामध्ये भारतात या क्षेत्रामध्ये वृद्धी करण्याच्या असलेल्या क्षमतेवर भर देण्यात आला.
फिक्की एव्हीजीसी-एक्सआर फोरमचे अध्यक्ष मुंजाल श्रॉफ यांनी या सत्राचे संचालन केले. या प्रतिष्ठित पॅनेलमध्ये माकोतो तेजुका, संचालक आणि सीईओ, नॉनटेट्रा; हिदेओ कात्सुमाता, अध्यक्ष, द ऍनिमे टाइम्स कंपनी, जपान; माकोतो किमुरा, सीईओ, ब्लू राइट्स, जपान; अत्सुओ नाकायामा, सीईओ आणि अध्यक्ष, री एंटरटेनमेंट कं. लि. आणि जिओस्टारच्या बिझनेस हेड – किड्स एंटरटेनमेंट अँड इन्फोटेनमेंट, अनु सिक्का यांचा समावेश होता.
हिदेओ कात्सुमाता यांनी भारतीय प्रेक्षक आणि भाषा यावर आता जास्त प्रमाणात भर दिला जात असल्याची माहिती दिली. सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक एकत्रीकरण यांच्या महत्त्वावर भर देत ते म्हणाले, "स्थानिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी आम्ही जपानी ऍनिमेशनला भारतीय परंपरांमध्ये कसे मिसळता येईल यावर विचार करत आहोत."
अत्सुओ नाकायामा यांनी जपानमध्ये ऍनिमेचा आर्थिक प्रभाव किती आहे यावर सखोल माहिती दिली आणि ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. त्यांनी जपानी ऍनिमेशनसाठी भारत एक आश्वासक बाजारपेठ असल्याचा आशावाद व्यक्त केला आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक तसेच व्यावसायिक संबंधांना जोडणाऱा सेतू उभारण्यात मनोरंजन व्यवसायाच्या संभाव्यतेवर भर दिला.
माकोतो तेजुका यांनी एका सविस्तर सादरीकरणात ऍनिमेच्या उत्पत्तीचा मागोवा घेतला आणि जपानी ऍनिमेशनची मुळे जपानच्या मांगा (MANGA) संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत, हे लक्षात आणून दिले.

अनु सिक्का यांनी भारतातील तरुण प्रेक्षकांना काय आवडते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी केलेल्या विस्तृत संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, "जपानी आशयाशी असलेली सांस्कृतिक समानता आणि भावनिक जोडणीमुळे भारतीय मुलांमध्ये ऍनिमेची लोकप्रियता वाढत आहे." त्यांनी पुढे सांगितले की प्रेक्षकसंख्येच्या कलाच्या वर्तनात्मक विश्लेषणाने प्रोग्रामिंगच्या निर्णयांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
माकोतो किमुरा यांनी ऍनिमेची जागतिक स्तरावर वाढती उपस्थिती आणि विविध देशांवर त्याच्या स्पष्ट प्रभावावर भर दिला.

योलोग्राम स्टाईलचे सीईओ आदित्य मणी यांनी संचालित केलेल्या "द न्यू आर्केड: व्हीसी’ज पर्स्पेक्टिव्ह ऑन गेमिंग न्यू फ्रंटियर" या माहितीपूर्ण चर्चा सत्रात भारतातील गेमिंग क्षेत्रातील रोमांचक संधी आणि नवोन्मेषांवर सखोल नजर टाकण्यात आली. या सत्रात साहसी भांडवलदारांच्या (VCs) एका प्रतिष्ठित पॅनेलने गेमिंग उद्योगातील प्रमुख कल, आव्हाने आणि संधींवर चर्चा केली. या पॅनेलमध्ये बिटक्राफ्ट व्हेंचरचे पार्टनर अनुज टंडन, जेटॅपल्टचे संस्थापक शरण तुलसियानी, इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्सचे संस्थापक आणि सीईओ विनय बन्सल, क्राफ्टन इंडियाचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट लीड निहांश भाट आणि जीएफआर फंडचे प्रिंसिपल जेरेमी लिम यांचा समावेश होता.
या पॅनेलने कथाकथन करणाऱ्यांचा देश म्हणून भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानावर भर दिला. भारताची समृद्ध सांस्कृतिक कथाकथन परंपरा अधिकाधिक संवादी माध्यमांमध्ये गुंफली जात आहे. गेमिंग केवळ चित्रपट आणि डिजिटल फॅशनमध्येच नव्हे, तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्येही मिसळले जात आहे आणि भारतीय गेमिंग स्टुडिओ महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले.

धाडसी कल्पनांना व्यापक प्रमाणात राबवण्याची एक अनोखी क्षमता भारतामध्ये आहे, ज्यांना इतरत्र यश मिळालेले नाही याकडे जेरेमी लिम यांनी लक्ष वेधले.
उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये यश मिळवण्यासाठी स्थानिकीकरणाच्या भूमिकेवर सत्रात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. जागतिक मॉडेल प्रेरणास्रोत ठरत असले तरी, पॅनेलने गेमिंग अनुभवांना स्थानिक अंतर्दृष्टी आणि ग्राहकांच्या वर्तनानुसार रूपांतरित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
2025 या वर्षाकडे पाहता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावाला अधोरेखित करण्यात आले. गेमप्ले वैयक्तिकृत करण्यात, वापरकर्त्याच्या संवादात वाढ करण्यात आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणाऱ्या कथाकथन पद्धतींना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सज्ज आहे.
व्हीएफएक्सवरील चर्चासत्राने आधुनिक सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सची निर्णायक भूमिका आणि कथाकथनाला आकार देण्यात त्याचे भविष्य जाणून घेण्याची एक अनोखी संधी दिली. फ्रेमस्टोअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अखौरी पी. सिन्हा यांनी या सत्राचे संचालन केले. या सत्रात डीएनईजीचे व्हीएफएक्स सुपरव्हायझर जयकर अरुद्रा; स्वतंत्र व्हीएफएक्स सुपरव्हायझर संदीप कमल; बाहुबली मधील कामासाठी प्रसिद्ध असलेले श्रीनिवास मोहन यांसारख्या प्रतिष्ठित पॅनेल सदस्यांचा समावेश होता. पॅनेल सदस्यांनी व्हीएफएक्स सिनेमॅटिक कथनात कशा प्रकारे क्रांती घडवत आहे, याबद्दल माहिती दिली.
जयकर अरुद्रा यांनी व्हीएफएक्स-प्रधान निर्मितीच्या रचनात्मक मागण्या पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि डिझाइनच्या महत्त्वावर भर दिला. "हे केवळ देखाव्याबद्दल नाही तर, कथेच्या सलगतेबद्दल आहे," असे ते म्हणाले. भारत व्हीएफएक्स उद्योगात महासत्ता बनण्यासाठी सज्ज आहे आणि वेव्हज हे स्वप्न साकार करण्यासाठी एक उत्तम उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.
"तंत्रज्ञान हा आमूलाग्र कायापालट घडवणारा एक घटक आहे," असे श्रीनिवास मोहन म्हणाले. ते म्हणाले, "जेव्हा त्याचा योग्य वापर केला जातो, तेव्हा ते आपल्याला मर्यादा ओलांडून जागतिक दर्जाचे दृश्य तयार करण्यास मदत करते."
संदीप कमल यांनी उच्च-गुणवत्तेच्या व्हीएफएक्स साधनांच्या वाढत्या सुलभतेवर आणि परवडणारी किंमत आता उत्कृष्टतेसाठी अडथळा कशी राहिली नाही यावर चर्चा केली. "स्पष्ट दृष्टी हीच गुणवत्ता आणि वेळेचे व्यवस्थापन हे दोन्ही साध्य करण्यात आपल्याला मदत करते," असे ते म्हणाले.
ऍनिमे, व्हीएफएक्स आणि गेमिंग जगभरात शक्तिशाली सांस्कृतिक तसेच व्यावसायिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना, या चर्चा सत्रांमध्ये तीव्र आशावाद व सहकार्याची भावना दिसून आली. या क्षेत्रांमध्ये भारतासाठी अभूतपूर्व क्षमता आहे. वेव्हज च्या भावनेला अनुसरून, या चर्चा सत्रांनी नवोन्मेष आणि कथाकथनाच्या महत्त्वाला अधोरेखित केले.
* * *
PIB Mumbai | S.Nilkanth/S.Patil/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126158)
| Visitor Counter:
15