माहिती आणि प्रसारण मंत्रालय
"प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात, एका कथेची नव्याने पटकथा लिहिणे": वेव्हज 2025 मध्ये माध्यम आणि मनोरंजनात साहस, समानता आणि लवचिकतेचा उत्सव केला जात आहे साजरा
वेव्हज 2025 मध्ये माजी जर्मन फुटबॉलपटू आणि जागतिक विजेती एरिअन हिंगस्ट हिने क्रीडा क्षेत्रात समान संधींचे केले समर्थन
वेव्हज 2025 मध्ये बियांका बाल्टी यांनी असमानतेला आव्हान देण्यात आणि निष्पक्ष प्रतिनिधित्वाला प्रोत्साहन देण्यात समाज माध्यमाचे सामर्थ्य केले अधोरेखित
रोना-ली शिमोन हिने वेव्हज 2025 मध्ये महिलांचा आवाज बुलंद करण्यात आणि सिनेमातील रूढीवादी कल्पनांना छेद देण्यात माध्यमांची भूमिका केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2025 10:40PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
वेव्हज 2025 जागतिक शिखर परिषदेत आज आयोजित "प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात , एका कथेची नवीन पटकथा लिहिणे " या विषयावरील पॅनेल चर्चेत तीन प्रेरणादायी वक्ते सहभागी झाले - फौदा सारख्या अॅक्शन-पॅक्ड नाट्यमय कलाकृतीमधील दमदार भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन; जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी; आणि माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना वैयक्तिक किंवा व्यावसायिक आव्हानांवर मात केली आहे

या आव्हानांमुळे खचून न जाता , या वक्त्यांनी त्याचा उपयोग अधिक विकसित होण्यासाठी आणि पुढे जाण्याचा एक नवीन मार्ग तयार करण्यासाठी केला. वेव्हज 2025 हा अशा लोकांचे यश साजरे करण्याचा मंच आहे जे कठीण अनुभवांना शक्तीमध्ये रूपांतरित करतात आणि आपल्या प्रवासातून इतरांना प्रेरणा देतात. हा एक असा मंच आहे जो साहस , परिवर्तन आणि नेतृत्वाचा सन्मान करतो , ज्यांनी सामाजिक अडथळ्यांवर मात केली आहे किंवा कठीण परिस्थितीतून ते बाहेर आले आहेत.
कार्यक्रमादरम्यान, एरिअन हिंगस्ट हिने पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला प्रवास सामायिक केला. लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसार माध्यमांकडून मिळणारी कमी प्रसिध्दी आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

समूह चर्चेचा भाग म्हणून, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने लवचिकतेची आणि बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची प्रबळ गाथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावतीचा मुद्दा तिने मांडला , महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा अनेकदा कमी पैसे दिले जातात आणि अजूनही माध्यमांमध्ये पुरुषांचे वर्चस्व आहे असे ती म्हणाली. माध्यमांची, विशेषतः समाज माध्यमाची खरी ताकद बदल घडवून आणण्याच्या त्याच्या क्षमतेमध्ये आहे यावर बियांका यांनी भर दिला . दबलेला आवाज उठवण्यास, असमानतेला आव्हान देण्यास आणि विशेषतः महिलांसाठी, योग्य प्रतिनिधित्वाला प्रोत्साहन देण्यात ते मदत करू शकते.

वेव्हज कथाकथकांना कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान उपलब्ध करुन देते, असे रोना-ली शिमोन यांनी कार्यक्रमादरम्यान माध्यमा नमूद केले. त्यांनी चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच त्यांना धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन केले. या चळवळीत समाज माध्यमाची महत्त्वाची भूमिका आहे, कारण हे माध्यम महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले. पडद्यावरील सशक्त आणि गतिमान भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोना-ली ताकद, कृती आणि खोली यांचा लिंगाशी संबंध नाही, हे सिद्ध करत मनोरंजन उद्योगातील रूढी तोडत आहेत.

इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज 2025 याच गोष्टीचे प्रतीक आहे: अशा व्यक्तींचा उत्सव साजरा करणे जे केवळ आव्हानांना तोंड देत नाहीत, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Sushma/Nikhilesh/D.Rane
रिलीज़ आईडी:
2125989
| Visitor Counter:
45