माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रभावाचा व्यवसाय : वेव्हज 2025 मध्ये कथा, रूची आणि उद्देश यांचा संगम
वेव्हज 2025 मध्ये महत्त्वाच्या कथांद्वारे संस्कृती, समुदाय आणि संभाषण घडवणाऱ्या सर्जकांचा सन्मान
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2025 9:15PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
अलगोरिदम म्हणजेच गणनविधीपेक्षा स्वर आणि कामगिरीपेक्षा रुची, वरचढ ठरणाऱ्या आशयघन विश्वात, वेव्हज 2025 मध्ये "द बिझनेस ऑफ इन्फ्लुएन्स: क्रिएटर्स शेपिंग ग्लोबल कल्चर" अर्थात प्रभावाचा व्यवसाय : जागतिक संस्कृतीला आयाम देणारे सर्जक हे अद्भुत सत्र विश्वासार्हता, कुतूहल आणि समुदायाने गुंफलेल्या एका तलम पटलासारखे उलगडले. YouTube APAC चे उपाध्यक्ष गौतम आनंद यांनी घेतलेल्या या सत्रात चार अनन्यसाधारण सर्जकांना एकत्र आणले ज्यांचा उत्कटता आणि उद्देशाच्या पायावरील जीवनप्रवास, डिजिटल जगाच्या कोन्यात हळुवार परिवर्तित होत आहे.
गौतम आनंद यांनी अब्जावधी भारतीयांच्या वतीने उद्घाटन समारंभातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करून सत्राचा प्रारंभ केला. ज्यांच्यात वैविध्य आणि प्रगल्भता आहे आणि जे सीमापार लकेर उमटवणाऱ्या कथांना आकार देण्यास सक्षम आहेत अशा सर्जकांना त्यांनी युट्यूब चा गाभा असे संबोधले.

या सत्राच्या सुरवातीला लोकप्रिय चॅनेल मेयो जपानचे जपानी सर्जक मायो मुरासाकी यांनी हिंदीमध्ये अस्खलितपणे बोलण्यास सुरुवात केली ज्याने प्रेक्षक अवाक झाले. हिंदीतील अध्ययनामुळे आणि भारतात वर्षभर वास्तव्य केल्याने कॉर्पोरेट विश्वातून युट्यूब वरील त्यांच्या संक्रमणाला चालना मिळाली. जपानी प्रेक्षकांसाठी भारताविषयीची आशय निर्मिती करणे हे कसे आनंदाबरोबर जबाबदारी बनले आहे हे त्यांनी सांगितले. "मी इतर देशांबद्दल कधीही नकारात्मक बोलत नाही," आणि "मी माझे संशोधन चांगले करते. परदेशात अनेकदा दिसणारी फक्त पोस्टकार्ड आवृत्तीचे नव्हे तर मी भारताची गहनता उलगडण्याचा प्रयत्न करते असे त्यांनी नमूद केले."
पाककला कलाकार आणि युट्यूब वरील लोकप्रिय शेफ रणवीर ब्रार यांनी स्वयंपाकातील 'सत्याचा क्षण' याबद्दल सांगितले, एक भावनिक नाद जो त्यांच्या प्रेक्षकांना भावतो. "मला वाटते की लोकांनी स्वयंपाकात त्यांचा रविवार शोधला पाहिजे," ते म्हणाले, आणि त्याच्यासाठी, कोणत्याही ब्रँड सहयोगापूर्वी त्याची विश्वासार्हता माझ्यासाठी सर्वोपरी आहे. "प्रथम जिव्हाळा, नंतर व्यवहार हे माझे ब्रीदवाक्य आहे" याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'भारतीय कृषकांच्या' मागचा चेहरा आकाश जाधव यांनी शेती सुलभ आणि शाश्वत बनवण्याबद्दल दृढनिश्चयाने कथन केले. त्यांचे चॅनेल सिंचन आणि शेतीबद्दल व्यावहारिक टिप्स देते. "शेती ही आपल्याला आवडते, मातीत रुजलेली गोष्ट आहे. आम्ही ते आपल्या स्वतःच्या लोकांसाठी करतो," असे नमूद करताना ते म्हणाले की टेबलावर स्वच्छ अन्न आणि शेतकऱ्यांसाठी समृद्धी इतके सोपे त्यांचे ध्येय आहे.
'चेस टॉक'चे जितेंद्र अडवाणी यांनी भारतीय घरांमध्ये कशा प्रकारे बुद्धिबळाने पुनरागमन केले असून हा खेळ चांगल्या प्रकारे बस्तान बसवत आहे, याचे वर्णन केले. " बालके, पालक, आजोबा-आजी, सगळ्यांच्या हातात पुन्हा एकदा बुद्धिबळाचा पट आला आहे," असे ते हसून म्हणाले. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमध्ये साधेपणा आणि मौजमजा यांचा मिलाफ आहे, या गोष्टी खेळाला आपल्याशी जोडण्यासाठी क्रिकेट आणि संस्कृतीतून घेतलेला आहे. "मी हा खेळ अगदी हलकाफुलका आणि प्रेमाने परिपूर्ण ठेवतो," असे ते म्हणाले.
या संवादामध्ये जागतिक स्तरावरील प्रेक्षकांच्या सहभागाच्या कल्पनांची गुंफण असून हे काम कशा प्रकारे भाषा आणि भूगोलाच्या सीमा ओलांडत असल्याचे या सर्जकांनी सामाईक केले. आकाश जाधव यांनी सांगितले की, त्यांच्या प्रेक्षकांमधील एक मोठा वर्ग भारताबाहेरचा आहे, जरी त्यांचा आशय हिंदीमध्ये असला तरी - "अन्न आपल्याला सर्वांना जोडते," याचा हा दाखला आहे असे ते म्हणाले., "बुद्धिबळावरील प्रेम जागतिक आहे," असेही जितेंद्र यांनी नमूद केले.
ज्यावेळी सर्जक मंडळी ब्रँडससोबत सहकार्य करत असतात, त्यावेळी आपला अस्सलपणा कसा काय कायम राखतात, असा प्रश्न गौतम आनंद यांनी विचारल्यावर हा संवाद अधिक जिवंत झाला. “ मी नेहमीच नाही म्हणून सुरुवात करतो”, ब्रार यांनी उत्तर दिले. “ जर तो ब्रँड खरोखर माझ्या मूल्यांना सुसंगत असेल तरच मी पुढे जातो.” कृत्रिम प्रज्ञेने देखील यात प्रवेश केला आहे. मेयो मुरासाकी म्हणाले की, ज्यावेळी कृत्रिम प्रज्ञा संकल्पनानिर्मितीमध्ये मदत करू शकते, त्याचवेळी काही वेळा ही मदत भीतीदायकही असू शकते. रणवीर ब्रार, जितेंद्र आणि आकाश जाधव यांनी कृत्रिम प्रज्ञा सबटायटलिंग आणि क्रिएटिव्ह साधनांसोबत केलेल्या प्रयोगांविषयी माहिती देत असताना त्यांच्या कामामध्ये मानवी संबंधाला केंद्रस्थानी ठेवत असल्याचे अधोरेखित केले.
महत्त्वाकांक्षी सर्जकांसाठी कोणता सल्ला द्याल, असे विचारल्यावर प्रतिसाद अतिशय हृदयस्पर्शी होते. “ अल्गोरिदमच्या मागे धावू नका, तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा,” रणवीर ब्रार म्हणाले. “ सातत्य राखा, अस्सल रहा आणि आशयाच्या पलीकडे विचार करा,” आकाश जाधव यांनी आवाहन केले. “ ज्यावर तुम्ही प्रेम करता त्याने सुरुवात करा,” जितेंद्र यांनी तोच सूर आळवला. मेयो मुरासाकी यांनी अतिशय जिव्हाळ्याने सांगितले, “ जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तर बाकी सर्व काही तुमच्या मागे येईल,” या सत्राच्या समारोपाच्या वेळी गौतम आनंद यांनी वक्ते आणि प्रेक्षकांचे आभार मानले. या सत्रातील वक्त्यांची एकत्रित ऊर्जा या गोष्टीची आठवण करून देत होती की, प्रभाव म्हणजे खरा प्रभाव केवळ ‘व्हायरल’ होण्याबद्दल नाही. तो आवाजाबद्दल आहे. हृदयाबद्दल आहे. आणि त्याचवेळी एक प्रामाणिक कथा सांगून जगाला आकार देण्याबद्दल आहे.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Vasanti/Shailesh/D.Rane
रिलीज़ आईडी:
2125958
| Visitor Counter:
67