माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीचे इनोव्हेट 2 एज्युकेट: वेव्हज- 2025 मध्ये हँडहेल्ड डिव्हाईस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांची घोषणा
Posted On:
27 APR 2025 7:45PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 27 एप्रिल 2025
इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने (आयडीजीएस) इनोव्हेट 2 एज्युकेट: हॅंडहेल्ड डिव्हाईस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेतील पहिल्या 10 अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने आयडीजीएसद्वारे आयोजित केली जात आहे आणि ही जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 चा एक भाग आहे. या स्पर्धेचा उद्देश तंत्रज्ञान, शिक्षण आणि गेमिंग यांच्या संगमावर तरुणांमध्ये नवोन्मेषाला चालना देणे, तसेच शिक्षणाचा अनुभव आमूलाग्र बदलवणाऱ्या हाताळण्याच्या उपकरणांसाठी नवे कल्पक डिझाईन तयार करणे हा आहे.
1856 नोंदणीकृत नाविन्यपूर्ण कल्पनांमधून कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर तज्ञ परीक्षकांच्या समितीने या पहिल्या 10 अंतिम स्पर्धकांची निवड केली आहे. परीक्षक समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील प्रमुख, तंत्रज्ञ, शिक्षक आणि डिझायनर यांचा समावेश आहे. समितीत इंद्रजीत घोष (सह-संस्थापक, एरुडिटिओ), राजीव नगर ( राष्ट्रीय व्यवस्थापक, भारत आणि सार्क, हुअन) आणि जेफ्री क्रे (सह-संस्थापक व उत्पादन प्रमुख, स्क्विड अकादमी) यांचा समावेश आहे.
10 अंतिम स्पर्धकांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. कर्नाट पारवा - कोड क्राफ्ट ज्युनियर (कर्नाटक)
2. विद्यार्थी - स्मार्ट लर्निंग टॅबलेट फॉर किड्स: एक इंटरॅक्टिव्ह आणि अडॅप्टिव्ह एज्युकेशनल कंपॅनियन (कर्नाटक आणि आंध्र प्रदेश)
या युवा नवोन्मेषकर्त्यांनी एक स्मार्ट लर्निंग टॅबलेट विकसित केले आहे. एक स्वस्त, आवाजाने चालणारे, इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक उपकरण जे इएसपी 8266 किंवा `रास्पबेरी पाय`च्या मदतीने चालते. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेले हे टॅबलेट महागड्या शिक्षण साधनांच्या आणि इंटरनेटच्या अभावामुळे येणाऱ्या अडचणींचा पर्याय म्हणून स्क्रीन मुक्त व इंटरनेट मुक्त शिक्षण देण्याचे उद्दिष्ट साधते.

3. टेक टायटन्स - स्मार्ट हँडरायटिंग लर्निंग डिव्हाइस विथ इंटरॅक्टिव्ह रायटिंग असिस्टन्स (तामिळनाडू)
पारंपरिक लेखन पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधत, सुलेखन शिकण्याचे उपकरण हे मुलांनी लेखन शिकण्याची पद्धत बदलण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या उपकरणाद्वारे तत्काळ संवाद प्रतिसाद - रिअल-टाइम इंटरॅक्टिव्ह फीडबॅक, बहुभाषिक शिक्षणाचा अनुभव आणि विना-इंटरनेट, परवडणारे शिक्षण साधन विशेषतः दुर्लक्षित भागांतील लहान मुलांसाठी उपलब्ध केले जाते.

4. प्रोटोमाइंड्स – एज्युस्पार्क (दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार)
एज्युस्पार्क हे एक किफायतशीर, कृत्रिम बुद्धिमत्ता-चालित हातात धरण्याजोगे उपकरण आहे जे 6 ते 8 वयोगटातील लहान मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी आणि संज्ञानात्मक वाढीला गती देण्यासाठी आरेखित केलेले आहे. मुले सुडोकू आणि गणिती कोड्यांपासून ते मेझ आणि मेमरी पझल्सपर्यंत शैक्षणिक खेळ खेळत असताना त्याच्या अनुकूल कृत्रिम बुद्धिमत्ता इंजिनाव्यतिरिक्त हे उपकरण रिअल-टाइममध्ये काठिण्य पातळी समायोजित करते तसेच प्रत्येक शिकणाऱ्याला प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या गतीने प्रगती करण्यास मदत करते.

5. एपेक्स अचिव्हर्स - बोडमास क्वेस्ट: गेमिफाइड मॅथ लर्निंग फॉर स्मार्टर एज्युकेशन (तामिळनाडू)
बोडमास (कंस, क्रम, भागाकार/गुणाकार, बेरीज/वजाबाकी) अनेकदा शिकणाऱ्या तरुणांसाठी आव्हाने निर्माण करते आणि त्यांचा गणितातील आत्मविश्वास आणि प्रगती दर्शवते. बोडमास क्वेस्ट शिक्षणाला एका खुमासदार, बक्षीस-आधारित प्रवासात रूपांतरित करून तरुणांची गणिताबद्दलची भीती घालवते.

6. सायन्सव्हर्स - मुलांसाठीचे हँडहेल्ड इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक उपकरण (इंडोनेशिया)
7. V20 - VFit - खेळाद्वारे परस्परसंवादी शिक्षण (तामिळनाडू)

8. वॉरियर्स- महाशास्त्र (दिल्ली)
महा-शास्त्र ही एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रणाली आहे जी 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या अनुभवाला रंगतदार बनवण्यासाठी आरेखित केलेले आहे. समावेशकता आणि प्रमाणीकरणासाठी तयार केलेले, हे व्यासपीठ भारत आणि परदेशात शिकणाऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी प्रश्नमंजुषा, रिअल-टाइम सिम्युलेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित ट्युटोरिंग आणि बहुभाषिक सहयोग एकत्रित करते. या प्रणालीचा गाभा एक हातात धरण्याजोगे कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित उपकरण आहे जे LoRa-आधारित मेशटास्टिक नेटवर्क वापरून परस्परसंवादी गेम, अनुकूलीत प्रश्नमंजुषा आणि ऑफलाइन सहकार्याद्वारे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवतो.

9. किड्डीमैत्री- एक हँडहेल्ड गणितीय गेमिंग उपकरण (मुंबई, ओदिशा, कर्नाटक)
एका चाचणीत सहभागी झालेल्या अर्ध्याहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी मूलभूत संख्याशास्त्रात जागतिक किमान मानकांपेक्षा कमी कामगिरी केल्याचे आढळून आले आहे. या गंभीर आव्हानाची दखल घेत, किड्डीमैत्रीने चमूने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधून प्रेरणा घेवून, स्थानिक भाषेतून शिक्षण, तांत्रिक एकात्मता आणि पारंपारिक भारतीय मूल्यांवर लक्ष केंद्रित करून स्थानिक आणि प्रभावी शिक्षण उपाय विकसित केले.

10. ई-ग्रूट्स- मायक्रो कंट्रोलर मास्टरी किट (तामिळनाडू)
शीर्ष 10 शॉर्टलिस्टेड संघ मुंबईतील वेव्हज 2025 दरम्यान एका विशेष प्रदर्शनात आपल्या कल्पना सादर करतील. आव्हानातील विजेत्यांना मंत्रालयाकडून ग्रँड फिनालेमध्ये सन्मानित केले जाईल.

तुम्हाला याबाबत काही प्रश्न आहेत का? त्याची उत्तरे येथे शोधा
पत्र सूचना कार्यालयाच्या चमूकडून वेव्हज संदर्भात अद्यतनित माहिती मिळवत राहा.
आताच वेव्हज साठी नाव नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | S.Patil/Nitin/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2124744)
| Visitor Counter:
25