पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेध
Posted On:
22 APR 2025 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल.त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
"जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल...त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल."
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123574)
Visitor Counter : 25
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam