उपराष्ट्रपती कार्यालय
संवैधानिक कार्यालये केवळ शोभेसाठी नाहीत; लोकशाहीत प्रत्येक नागरिक सर्वोच्च स्थानी असतो, यावर उपराष्ट्रपतींचा भर
Posted On:
22 APR 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले, “कोणत्याही लोकशाहीत, प्रत्येक नागरिकाला भूमिका फार महत्त्वाची असते. माझ्या मते, नागरिक हा सर्वोच्च स्थानी आहे कारण नागरिक एक देश आणि लोकशाही यांची उभारणी करतात. नागरिकांपैकी प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका असते. प्रत्येक नागरिकामध्ये लोकशाहीचा आत्मा वसतो आणि त्याच्या हृदयात स्पंदने निर्माण करतो. यातून लोकशाहीची भरभराट होते.”
दिल्ली विद्यापीठात भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘कर्तव्यम’ या कार्यक्रमात आज उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती तसेच दिल्ली विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती धनखड म्हणाले, “संविधानात कोणालाही संसदेपेक्षा वरचे स्थान देण्याची परिकल्पना केलेली नाही. संसदेला सर्वोच्च स्थान दिलेले आहे आणि हीच खरी परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशातील प्रत्येक नागरिकाप्रमाणेच या संसदेला देखील सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.”
लोकशाहीमध्ये नागरिकांनी बजावण्याच्या कर्तव्यांवर प्रकाश टाकताना, ते म्हणाले, “लोकशाही केवळ सरकारला शासन करता यावे यासाठी नाही. ही सह्भागात्मक लोकशाही आहे, यात केवळ कायदे नाहीत, संस्कृती आणि नैतिक मूल्ये देखील आहेत.नागरिकत्व केवळ दर्जाची नव्हे तर कृतीची मागणी करते. सरकारांमुळे लोकशाही साकार होत नाही तर व्यक्तींमुळे लोकशाहीची घडण होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना, उपराष्ट्रपती म्हणाले, “अभिव्यक्ती आणि संवादांतून लोकशाही फुलत जाते हे आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी काही मूलभूत मंत्र आहेत.जर तुमच्या अभिव्यक्तीच्या हक्काची गळचेपी होत असेल किंवा त्यावर नियंत्रण घालण्यात येत असेल – जसे आणीबाणीच्या काळात घडले तसे घडत असेल- तर लोकशाही घुसमटते. मात्र, जर तुमच्याकडे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असेल आणि त्यातून उद्धटपणा आणि अहंकार प्रदर्शित होत असेल- आणि तुमचा असा दावा असेल की तुमची अभिव्यक्ती सर्वांपेक्षा उच्च स्थानी आहे आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही दृष्टीकोनाचा विचार करणे नाकारता, दुसरी बाजू लक्षात घ्यायला नकार देता- तर आपल्या नागरी संस्कृतीनुसार हे देखील खरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे. “जर तुम्ही योग्य वेळी, योग्य गट आणि योग्य व्यक्तीला योग्य गोष्ट बोलण्यात संकोच करत असाल तर तुम्ही स्वतःला तर दुबळे बनवताच पण त्याचसोबत त्या सकारात्मक शक्तींना देखील खोलवर दुखावता.”
राष्ट्र उभारणीत तरुणांच्या भूमिकेवर अधिक भर देत उपराष्ट्रपती जगदीप धनखड पुढे म्हणाले, “संवादांचा दर्जा आपल्या लोकशाहीची व्याख्या करते आणि यात आपल्या तरुणांना पक्षपातीपणाच्या पलीकडे जाऊन विवेकी विचारशीलतेपर्यंत स्वतःला पोहोचवावे लागेल यात मला शंका वाटत नाही.”
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123480)
Visitor Counter : 16