सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 23 एप्रिल रोजी केंद्रीय पुरातत्व सल्लागार समितीच्या 38 व्या बैठकीचे आयोजन

Posted On: 22 APR 2025 3:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2025

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 23 एप्रिल रोजी बुधवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची (CABA) 38 वी बैठक आयोजित केली आहे.

भारत सरकारने 1945 मध्ये या मंडळाची स्थापना केली. पुरातत्व संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि भारतीय विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आली.

भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री आणि केंद्रीय पुरातत्व सल्लागार समितीचे अध्यक्ष गजेंद्र सिंह शेखावत यांच्या मान्यतेनंतर राजपत्र अधिसूचनेद्वारे दर तीन वर्षांनी मंडळाची पुनर्रचना केली जाते.

केंद्रीय पुरातत्व सल्लागार समितीची 37 वी बैठक 14.06.2022 रोजी भारत सरकारचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री, जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

केंद्रीय पुरातत्व सल्लागार समितीच्या आगामी 38 व्या बैठकीत सल्लागार मंडळाच्या सदस्यांनी मांडलेले ठराव/सूचना आणि गेल्या  बैठकीत झालेल्या ठराव/सूचनांवर केलेल्या कार्यवाहीवर चर्चा केली जाईल.

 

* * *

JPS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123431)