पंतप्रधान कार्यालय
जागतिक यकृत दिनानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना सजग आहार पद्धतीचा अंगीकार करण्याचे आणि लठ्ठपणाविरुद्ध लढा देण्याचे केले आवाहन
Posted On:
19 APR 2025 1:13PM by PIB Mumbai
जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना सजग आहार पद्धती स्वीकारण्याचे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. छोट्या पण परिणामकारक बदलांचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी असे नमूद केले की, तेलाचे सेवन कमी करणे यासारखी साधी कृतीही एकूण आरोग्य आणि निरामयता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
"सजग आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत #WorldLiverDay साजरा करण्याचा प्रशंसनीय प्रयत्न. तेलाचे सेवन कमी करणे यासारखी छोटी पाऊले मोठा फरक घडवू शकतात. चला, लठ्ठपणाविषयी जागरूकता वाढवून एक सशक्त, आरोग्यदायी भारत घडवूया.
#StopObesity"
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2122883)
Visitor Counter : 68
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam