गृह मंत्रालय
मोदी सरकार कठोरपणे अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून नष्ट करत आहे – केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शाह
अंमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा करताना आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ 1800 कोटी रुपये किमतीचे 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्याची अभूतपूर्व कारवाई
समुद्रातील ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोदी सरकारच्या संपूर्ण सरकार दृष्टीकोनाच्या यशाचे लखलखीत उदाहरण
गुजरात पोलिसांचे एटीएस पथक व भारतीय तटरक्षक दलाची गृहमंत्र्यांकडून प्रशंसा
Posted On:
14 APR 2025 12:35PM by PIB Mumbai
केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार अत्यंत कठोरपणे अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करत आहे.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात केंद्रिय गृह मंत्र्यांनी म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ 1800 कोटी रुपये किमतीचे 300 किलो अंमली पदार्थ जप्त करणे हा अंमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यामधील एक उल्लेखनीय टप्पा आहे. समुद्रातील ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थाचा भस्मासूर समूळ नष्ट करण्यासाठी मोदी सरकारच्या संपूर्ण सरकार दृष्टीकोनाच्या यशाचे लखलखीत उदाहरण आहे. गुजरात पोलिसांचे एटीएस पथक आणि भारतीय तटरक्षक दलाचे या मोठ्या यशाबद्दल अभिनंदन.”
***
N.Chitale/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121584)
Visitor Counter : 25