अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवकार महामंत्र दिवस: महावीर जयंती साजरी

Posted On: 10 APR 2025 1:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2025 

 

"जैन धर्माचे साहित्य हा भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे.हे  ज्ञान जतन करणे आपले परमकर्तव्य आहे" - पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन 

महावीर जयंती हा  दिवस; जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनाचे स्मरण करून, सखोल आध्यात्मिक अनुभूती आणि प्रबुद्ध शांतता प्रतिध्वनित करत भारत आदरपूर्वक साजरा करत असतो.एखाद्या उत्सवापेक्षाही, हा दिवस करुणा, आत्मसंयम आणि सत्याला समर्पित केलेल्या जीवनाला दिली जाणारी भावपूर्ण आदरांजली आहे. सर्वत्र संघर्ष आणि अराजकतेने ढग असलेल्या या जगात,अनेकदा भगवान महावीर यांचा अहिंसा, सत्य आणि आंतरिक प्रबुध्दतेचा चिरंतन संदेश नेहमीपेक्षा अधिक तेजाने उजळून निघतो, असंख्य आत्म्यांना अधिक सजग आणि सुसंवादी अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी  मार्गदर्शन करतो.

या वर्षी, 9 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवकार महामंत्र देऊन  उद्घाटन करत,  या भावनेला समर्थन देण्याचे आवाहन करत महावीर जयंती साजरी करण्यात आली.

"नवकार मंत्र हा केवळ मंत्र नाही तर आपल्या श्रद्धेचा गाभा आणि जीवनाचे सार आहे."

जैन प्रार्थनेचा केंद्रबिंदू असलेला नवकार मंत्र हा केवळ पवित्र अक्षरांचा समूह नसून त्यापेक्षा  अधिक काही आहे, तो ऊर्जा, स्थिरता आणि प्रकाश यांचा लयबद्ध प्रवाह आहे.

जैनधर्मीय आचार्यांनी लहानपणापासूनच आपल्यात समजूतदारपणा कसा निर्माण केली हे सांगत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, गुजरातमधील स्वतःच्या मूलाधारांविषयी चिंतन केले.या वैयक्तिक संबंधांमुळे जैन धर्म केवळ एक ऐतिहासिक धर्म नसून आपली मुळे न विसरता विकसित होऊ इच्छिणाऱ्या, विशेष करून भारतासारख्या  देशाशी सखोलपणे जोडलेला आहे, या संदेशाला बळकटी मिळते.

ही प्रासंगिकता आधुनिक भारताच्या स्थापत्य आणि सांस्कृतिक जडणघडणीत अंतर्भूत आहे, मग ते नवीन संसदेच्या प्रवेशद्वारावरील सम्येद शिखराचे चित्रण असो किंवा परदेशातून परत आलेल्या प्राचीन तीर्थंकरांच्या मूर्ती असोत.  या केवळ स्मरणरंजन करण्याच्या कलाकृती नाहीत;  ते भारताच्या आध्यात्मिक निरंतरतेचे जागृत प्रतीक आहे.

हवामान बदल हे आजचे सर्वात मोठे संकट असल्याचे सांगून, जैन समाजाने शतकानुशतके आचरणात आणलेली शाश्वत जीवनशैली हा त्यावरील उपाय असल्याचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.जैन समाज अनेक शतकांपासून साधेपणा, संयम आणि शाश्वती या तत्त्वांवर जगत आहे.भगवान महावीरांची कालातीत शिकवण मिशन लाइफ(LIFE) (पर्यावरणासाठी जीवनशैली), या शाश्वत जीवनासाठी राष्ट्रीय आवाहनाला अतिशय  सुंदरपणे संरेखित करते.

जैन धर्माचे प्रतीक, “परस्परोपाग्रहो जीवनम्”, म्हणजे परस्परांचे एकमेकांच्या जीवनावरील अवलंबित्व हा एक गहन पर्यावरणीय जागतिक दृष्टीकोन बहाल करते.

नव भारतासाठी नऊ संकल्प

भारतीय आणि जैन परंपरेतील "नऊ" या संख्ये च्या सामर्थ्याला काव्यात्मक आदरांजली अर्पण करताना, पंतप्रधानांनी नवकार मंत्राद्वारे नऊ संकल्प प्रस्तावित केले, प्रत्येक संकल्पना ज्ञान, कृती, सुसंवाद आणि मूळ प्रगतीसाठी वचनबद्ध आहे.हा मंत्र नऊ वेळा किंवा 27, 54 किंवा 108 या  सारख्या नवाच्या पटीत जपणे हे आध्यात्मिक पूर्णता आणि बौद्धिक स्पष्टता कशी दर्शवते हे त्यांनी नमूद केले.

  • पहिला संकल्प: जलसंधारण- पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य ओळखून त्याची बचत करण्याच्या गरजेवर जोर देणे.
  • दुसरा संकल्प: आपल्या मातेच्या नावाने एक झाड लावा- अलीकडच्या काही महिन्यांत 100 कोटींहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प करत  प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून  तिचे आशीर्वाद मिळविण्यासाठी त्याचे संगोपन करा.
  • तिसरा संकल्प: स्वच्छता अभियान – प्रत्येक गल्ली, परिसर आणि शहरातील स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि त्यात योगदान देणे.
  • चौथा संकल्प: व्होकल फाॅर लोकल(स्थानिकांच्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आवाज उठवणे)- स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांचा प्रचार, आणि भारतीय माती आणि भारतीय कामगारांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी  त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • पाचवा संकल्प: भारताचे अन्वेषण  करा- देशाच्या प्रत्येक  प्रदेशाचे वैशिष्ट्य आणि मूल्य यावर भर  देऊन परदेशात पर्यटनास जाण्यापूर्वी भारतातील विविध राज्ये, संस्कृती आणि प्रदेश यांना भेट देत त्यांचा शोध घ्यावा 
  • सहावा संकल्प: नैसर्गिक शेती अंगीकारणे- “एका जीवाने दुसऱ्या जीवाला कधीही हानी पोहोचवू नये”या  जैन तत्वाचा अंगिकार करतआणि पृथ्वी मातेला रसायनांपासून मुक्त करणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि नैसर्गिक शेतीला चालना देणे.
  • सातवा संकल्प: निरामय  जीवनशैली- भारतीय आहार परंपरांचे पालन करणे, ज्यात भरड धान्याचा वापर करत  (श्री अन्न), तेलाचा वापर 10% कमी करणे, नियम आणि संयमाने आरोग्याचे रक्षण करणे.
  • आठवा संकल्प: योग आणि खेळ यांचा रोजच्या जीवनशैलीत समावेश करणे- शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती सुनिश्चित करण्यासाठी योग आणि खेळांना दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणे, मग ते घर असो, कामाचे ठिकाण, शाळा किंवा उद्यान कुठेही.
  • नववा संकल्प: गरिबांना मदत करणे-सेवेचे खरे  तत्व म्हणजे वंचितांना मदत करणे, मग ते  हात धरून असो  किंवा मुबलक प्रमाणात (थाळी भरून).

हे सर्व संकल्प जैन धर्माच्या तत्त्वांशी आणि शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण भविष्याच्या दृष्टिकोनाशी जुळणारे आहेत.

प्राकृत आणि पाली भाषेत कोरलेल्या जैन साहित्यात विचारांचा मोठा खजिना सामावलेला आहे.  या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा आणि ज्ञान भारतम मिशन अंतर्गत जैन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा उपक्रम ही  या प्राचीन ज्ञानाला दिलेली आदरांजली आहे.

मार्च 2024 मध्ये, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठ (DAVV) मध्ये 'जैन अभ्यास केंद्र' स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK) योजनेअंतर्गत विविध प्रकल्प मंजूर केले.25 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करत, या केंद्राचे उद्दिष्ट जैन वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे, आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणे आणि जैन धर्माची जगण्याची शैली म्हणून जागतिक स्तरावर त्याची ओळख करून देणे हे आहे.हे प्राचीन जैन ग्रंथांच्या डिजिटायझेशनला समर्थन देईल, शैक्षणिक संशोधन सुलभ करेल आणि विद्यार्थी आणि विद्वानांसाठी जैन शिकवण, परंपरा आणि पद्धतींशी संलग्न होण्यासाठी केंद्र म्हणून काम करेल, तसेच समुदायाची प्रतिबद्धता आणि जागरूकता वाढवेल.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने काही काळापूर्वी हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि जैन परंपरेवरील आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देऊन जैन संस्कृतीचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

एप्रिल 2024 मध्ये महावीर जयंतीच्या दिवशी, 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवानिमित्त टपाल विभागाने एक स्मरणार्थ मुद्रांक आणि नाणे प्रकाशित केले आहे.

भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना, भगवान महावीर यांच्या नवकार मंत्राचा सुसंवाद, साधूंच्या शिस्तीत आणि जीवनाच्या परस्परावलंबनात, केवळ व्यक्तींसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अंतर्मनावरील विजय, करुणा आणि सत्याचा  संदेश मार्गदर्शक प्रकाश दाखवतो.

References:

Download in PDF

 

* * *

A.Chavan/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120689) Visitor Counter : 28