पंतप्रधान कार्यालय
थायलंडचे राजे आणि राणीसोबत पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 6:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमधील दुसित पॅलेसमध्ये थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न फ्रा वाजिराकलाओचाओयुहुआ आणि महाराणी सुथिदा बजरासुधाबिमलालक्षण यांची भेट घेतली.
भारत आणि थायलंडमधील सामायिक सांस्कृतिक वारशाबद्दल त्यांनी विचारांचे आदानप्रदान केले. या संदर्भात त्यांनी गेल्या वर्षी भारतातून थायलंडमध्ये आणण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या अवशेषांचा उल्लेख केला. तसेच यामुळे दोन्ही देशांमधील व्यक्तीकेंद्रित संबंध अधिक मजबूत करण्यासाठी झालेला सकारात्मक परिणाम याबद्दल दोघांनी चर्चा केली. त्यांनी दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली.
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2119072)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam