पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 4:17PM by PIB Mumbai
बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेपाळच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि घनिष्ठ संबंधांचा आढावा घेतला. भौतिक आणि डिजिटल दळणवळण, उभय देशातील लोकांचे संबंध आणि ऊर्जा क्षेत्र यातील प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उभय देश आणि लोकांमधील बहुपक्षीय भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करत राहण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
'शेजारी प्रथम' या धोरणांतर्गत नेपाळ भारताचा प्राधान्य भागीदार देश आहे. ही बैठक दोन्ही देशांमधील नियमित उच्चस्तरीय संवादाची परंपरा कायम राखण्याचे प्रतीक आहे.
***
S.Kakade/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2118924)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam