भारतीय निवडणूक आयोग
केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसोबत साधला सर्वात मोठा व्यापक संवाद
देशभरात सीईओ, डीईओ आणि ईआरओ पातळीवर 4,719 बैठका, राजकीय पक्षांचे 28,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी
Posted On:
01 APR 2025 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) आणि मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या पातळीवर राजकीय पक्षांसोबत रचनात्मक बैठकांची शृंखला आयोजित केली. 31 मार्च 2025 ला संपलेल्या 25 दिवसांत एकूण 4,719 बैठका झाल्या. पैकी सीईओंनी 40, डीईओंनी 800 तर ईआरओंनी 3,879 बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये राजकीय पक्षांचे देशभरातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
नवी दिल्लीतील आयआयआयडीईएम येथे 4-5 मार्च 2025 रोजी झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार या बैठका झाल्या.
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 आणि 1951; मतदार नोंदणी नियम 1960; निवडणूक आचार नियम 1961 आणि निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमावली, मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांच्या विद्यमान कायदेशीर चौकटीत संबंधित सक्षम अधिकारी म्हणजेच ईआरओ किंवा डीईओ किंवा सीईओ यांच्याकडून कोणत्याही प्रलंबित समस्या सोडवणे हे या बैठकांचे उद्दिष्ट आहे. पुढील मूल्यांकनासाठी सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओंकडून कृती अहवाल मागवण्यात आला आहे आणि विद्यमान कायदेशीर चौकटीत निराकरण न झालेला कोणताही मुद्दा आयोगाकडून विचारात घेतला जाईल.
या बैठकांना राजकीय पक्षांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विधानसभा मतदारसंघ, जिल्हे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. देशभरातील बैठकांची छायाचित्रे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाहता येतील:
https://x.com/ECISVEEP?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor
* * *
S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117358)
Visitor Counter : 27