आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने बिहारमध्ये चौपदरी ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड पाटणा-आरा-सासाराम महामार्ग (एनएच-119A) (120.10 किमी) "हायब्रीड ॲन्यूइटी मोड" (एचएएम) वर बांधण्यास दिली मंजुरी

Posted On: 28 MAR 2025 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयावरील समितीने (सीसीईए), पाटणा–आरा–सासाराम महामार्गाच्या चौपदरी  प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड कॉरिडॉरच्या 120.10 किमी लांबीच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प हायब्रिड ॲन्यूइटी  मोड (एचएएम) वर विकसित केला जाणार असून, त्याचा एकूण भांडवली खर्च 3,712.40 कोटी रुपये इतका असेल.

सध्या, सासाराम, आरा आणि पाटणा यांच्यातील वाहतूक राज्य महामार्गांवर (एसएच-2, एसएच-12, एसएच-81 आणि एसएच-102) अवलंबून आहे, आणि तीव्र वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला 3-4 तास लागतात, विशेषतः आरा शहरात. वाहतुकीची वाढती समस्या सोडवण्यासाठी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे, तसेच 10.6 किमी ब्राउनफिल्ड महामार्गाचे उन्नतीकरण केले जाणार आहे, ज्यामुळे आरा, ग्राहिणी, पीरो, बिक्रमगंज, मोकर आणि सासाराम या दाट वस्तीच्या भागांतील वाहतूक सुलभ होईल.

प्रकल्पाचा मार्ग एनएच-19, एनएच-319, एनएच-922, एनएच-131G, आणि एनएच-120 या प्रमुख वाहतूक कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे औरंगाबाद, कैमूर आणि पाटणा यांना अखंडित आणि जलद वाहतूक संपर्क मिळेल. याव्यतिरिक्त, हा प्रकल्प खालील महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट वाहतूक संपर्क प्रदान करेल: 

  • 2 विमानतळ: जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ (पाटणा) आणि प्रस्तावित बिहटा विमानतळ
  • 4 प्रमुख रेल्वे स्थानके: सासाराम, आरा, दानापूर आणि पाटणा
  • 1 अंतर्देशीय जलवाहतूक टर्मिनल: पाटणा

याशिवाय, हा महामार्ग पाटणा रिंग रोडशी थेट जोडला जाणार असून, त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाटणा, लखनौ, रांची आणि वाराणसी यांच्यातील दळणवळण  सुधारेल, ज्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला गती मिळेल. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि स्थानिक व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण होतील.

हा प्रकल्प सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत'  दृष्टिकोनाशी सुसंगत असून, तो आधुनिक पायाभूत सुविधा उभारून रोजगारनिर्मिती, सामाजिक-आर्थिक प्रगती आणि बिहारच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल.

प्रकल्पाद्वारे 48 लाख  श्रम दिन एवढा रोजगार निर्माण होणार असून, पाटणा आणि आसपासच्या भागांमध्ये  विकासाच्या नव्या संधी खुल्या होतील.

Map of Corridor

Project Details:

Feature

Details

Project Name

4-Lane Greenfield & Brownfield Patna-Arrah-Sasaram Corridor

Corridor

Patna-Arrah-Sasaram (NH-119A)

Length (km)

120.10

Total Civil Cost (Rs. in Cr.)

2,989.08

Land Acquisition Cost (Rs. in Cr.)

718.97

Total Capital Cost (Rs. in Cr.)

3,712.40

Mode

Hybrid Annuity Mode (HAM)

Major Roads Connected

National Highways - NH-19, NH-319, NH-922, NH-131G, NH-120

State Highways - SH-2, SH-81, SH-12, SH-102

Economic / Social / Transport Nodes Connected

Airports: Jay Prakash Narayan International Airport (Patna), Bihita Airport (upcoming)

Railway Stations: Sasaram, Arrah, Danapur, Patna

Inland Water Terminal: Patna

Major Cities / Towns Connected

Patna, Arrah, Sasaram

Employment Generation Potential

22 lakh person-days (direct) & 26 lakh person-days (indirect)

Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25

Estimated at 17,000-20,000 Passenger Car Units (PCUs)

 

* * *

S.Kakade/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2116310) Visitor Counter : 49