माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सॅन फ्रॅन्सिस्कोमधील ‘गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स’(जीडीसी) मध्ये ‘इंडिया पॅव्हेलियन’चे पदार्पण
वेव्हज -'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' विजेते जीडीसीमध्ये ठरले लक्षवेधी
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2025 7:41PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 20 मार्च 2025
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स’(जीडीसी)मध्ये ‘इंडिया पॅव्हेलियनने पदापर्णातच प्रभाव दर्शवला आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील भारताचे महावाणिज्य दूत डॉ.के.श्रीकर रेड्डी यांनी पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.याप्रसंगी उप महावाणिज्य दूत राकेश अडलखा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एनएफडीसीच्या ‘डिजिटल ग्रोथ’चे प्रमुख तन्मय शंकर उपस्थित होते.

‘गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स’(जीडीसी)चे आयोजन 17 ते 21 मार्च, 2025 या कालावधीत करण्यात आले आहे.गेम विकासक आणि उद्योग व्यावसायिकांसाठी हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रभावशाली कार्यक्रम आहे. यामध्ये गेम रचना, तंत्रज्ञान आणि व्यवसायातील नवीन कल याविषयावरील व्याख्याने, गटचर्चा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
वेव्हजचा प्रचार: भारताची प्रमुख ‘एम अँड ई’ शिखर परिषद
भारतीय पॅव्हेलियनचा मुख्य उद्देश 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या आगामी जागतिक दृक श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा (वेव्हज) प्रचार करणे आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) द्वारे आयोजित आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या नेतृत्वाखाली, ‘वेव्हज’ हे जागतिक प्रसार माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई) उद्योगाचे लक्ष भारताकडे आकर्षित करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ बनण्यास सज्ज आहे. या माध्यमाव्दारे व्यापार, नवोन्मेष आणि सीमापार सहकार्यांना चालना देण्यात येईल. तसेच भारताला जगाचे आशय निर्माता केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारताच्या ‘गेमिंग’उत्कृष्टतेवर टाकला प्रकाश
जीडीसी येथील ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये अत्याधुनिक प्रदर्शक आणि नवोन्मेषक आहेत; त्यामुळे भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या गेमिंग उद्योगावर प्रकाश टाकण्यात येत आहे.या पॅव्हेलियनमध्ये देशातील काही आघाडीच्या गेम विकासक कंपन्यांचा समावेश आहे.त्यामध्ये नजारा टेक्नॉलॉजीज आणि विनझो यांचा समावेश आहे.त्याबरोबराच आयजीडीसी 2024 पुरस्कार विजेते - वाला इंटरएक्टिव्ह, ब्रूएड गेम्स, झिग्मा गेम्स आणि सिंग्युलर स्कीम यांचाही समावेश आहे. या पॅव्हेलियनमध्ये सहभागी झालेल्या कंपन्या त्यांच्यातील सर्जनशीलता आणि गेम विकसनामधील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहेत.

याव्यतिरिक्त, पॅव्हेलियन वेव्हजचा भाग म्हणून ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ अंतर्गत भारत टेक ट्रायम्फ सीझन 3 मधील विजेत्यांना अधोरेखित केले आहे.
· युडिझ सोल्युशन्स
· ब्राह्मण स्टुडिओ
· गॉडस्पीड गेमिंग
· सेकंड क्वेस्ट
· ओव्हर द मून स्टुडिओ
· गेम टू मेकर
· पारिया इंटरएक्टिव्ह
· लिस्टो
· मिक्सर
· लिटिल गुरू
· मोनो टस्क स्टुडिओ
· गेमइऑन
· फनस्टॉप
· अब्राकाडाब्रा
‘द इंडिया पॅव्हेलियन’ सहकार्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम करीत असून भारतीय गेमिंग कंपन्यांना जागतिक विकासक, प्रकाशक आणि गुंतवणूकदारांशी जोडण्यात येते. सह-निर्मिती, तंत्रज्ञान भागीदारी आणि आशय- सामग्री वितरण या विषयांवर संवाद साधून, पॅव्हेलियन जागतिक गेमिंग बाजारपेठेत भारतीय स्टुडिओसाठी नवीन वाढीच्या संधी निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे.
‘एनएफडीसी’विषयी माहिती -
एनएफडीसी म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ही देशातील चांगल्या चित्रपट चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेली केंद्रीय संस्था आहे.
‘वेव्हज’विषयी माहिती -
माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई ) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारी, पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई,येथे आयोजित केली आहे.
याविषयी काही प्रश्न आहेत का? उत्तरे शोधण्यासाठी येथे क्लिक करणे.
चला तर मग, आमच्यासोबत प्रवासाला! वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा (लवकरच येत आहे!).
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2113398
| Visitor Counter:
44