पंतप्रधान कार्यालय
जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल जर्मन गायिका कॅसमे यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
18 MAR 2025 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन गायिका कॅसमे यांची प्रशंसा केली आहे.
कॅसमे सारख्या लोकांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीत भर घालण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. कॅसमे यांनी इतर अनेकांसह समर्पित प्रयत्नांद्वारे भारताच्या वारशाची समृद्धता, सखोलता आणि विविधता प्रदर्शित करण्यास मदत केली आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;
"भारतीय संस्कृतीबद्दल जगाची उत्सुकता वाढतच आहे आणि कॅसमे सारख्या लोकांनी या सांस्कृतिक देवाणघेवाणीत भर घालण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. त्यांनी इतर अनेकांसह समर्पित प्रयत्नांद्वारे भारताच्या वारशाची समृद्धता, गहनता आणि विविधता प्रदर्शित करण्यास मदत केली आहे.#MannKiBaat"
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2112305)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam